'तिने' करून दाखवलं! पपईमुळे महिलेचं नशीब फळफळलं; आता करते 'अशी' लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 11:44 IST2023-08-22T11:43:06+5:302023-08-22T11:44:25+5:30
एक महिलेने शेती करून कमाल केली आहे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात आहेत.

'तिने' करून दाखवलं! पपईमुळे महिलेचं नशीब फळफळलं; आता करते 'अशी' लाखोंची कमाई
बिहारच्या महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात आहेत. याच दरम्यान, एक महिलेने शेती करून कमाल केली आहे. आशा देवी या फलोत्पादन योजनेच्या मदतीने वर्षभर सेंद्रिय पपईची लागवड करतात. "जेव्हा शेतीशी कोणताही संबंध नव्हता, तेव्हा अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. परंतु सध्या शेती हेच कुटुंबाच्या समृद्धीचे माध्यम राहिले आहे" असं आशा देवी यांनी म्हटलं.
पपई शेतीबाबत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी विज्ञान केंद्रात वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. चेरिया बरियारपूर ब्लॉकच्या श्रीपूर पंचायत प्रभाग क्रमांक-9 मधील रहिवासी आशा देवी यांनीही या प्रशिक्षणात भाग घेतला. त्यांनी सांगितले की, "त्यांच्याकडे शेत आहे. या शेतात पपईच्या संकरित जातीची लागवड करण्यात आली आहे. पपई लागवडीसाठी फलोत्पादन योजनेतून 21 हजार रुपये देण्यात आले."
"आम्ही 20 रुपयांना एक रोप आणले. तर शासनाकडून प्रति रोप 13.50 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे." महिला शेतकरी आशा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शेतात पपईच्या लागवडीवर वर्षाला 50 हजार रुपये खर्च होतात. त्याच वेळी 21 हजार रुपये सरकारी मदत म्हणून उपलब्ध आहेत. जर आपण काही करण्याचा निर्धार केला तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही."
"माझ्या बाबतीतही तेच झालं. शेजाऱ्याचे टोमणे ऐकूनही मी हिंमत न हारता आपल्या जमिनीवर पपईची लागवड करण्यास सुरू केली. आज या भागात 6.50 रुपये खर्चाच्या पपईच्या रोपातून 40 किलो पपईचे उत्पादन घेतले जाते. आम्ही वर्षाला 2.50 लाख कमवत आहोत." आशा देवींपासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.