शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरीवरुन पालखी सोहळ्याला सुरुवात

By admin | Updated: May 25, 2015 02:11 IST

शिवराज्याभिषक दिन : तुतारीचा निनाद आणि ढोलताशांचा गजर

शिवराज्याभिषक दिन : तुतारीचा निनाद आणि ढोलताशांचा गजर

पुणे : रणरणत्या उन्हात ५१ तुतारी वादकांच्या ललकारी, ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या घोषात रविवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे उत्साहाच्या वातावरणात रायगडाकडे प्रस्थान केले.
शिव धनुष्य प्रतिष्ठान व श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळ्यातर्फे शिवनेरी ते रायगड किल्ल्यापर्यंत पायी पालखी सोहळा २४ मे ते ६ जून या कालावधीत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केला आहे. सर्व शिवभक्त व शिवप्रेमी या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होतात. पायी पालखी सोहळ्याचे यंदा हे दुसरे वर्ष आहे.
प्रतिष्ठानचे शिवभक्त सकाळपासून शिवनेरी गडावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून सकाळी ११.३० वाजता पायी सोहळ्यास प्रारंभ झाला. किल्ले अभ्यासक, इतिहास संशोधक प्रमोद मांडे यांच्या हस्ते सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ किलो वजनाच्या पितळी मूर्तीची पूजा करण्यात आली. या वेळी ५१ तुतारी वादकांनी ललकारी देत शिवरायांना सलामी दिली.
शिवजयंती महोत्सव समितीचे प्रमुख अमित गायकवाड, पराग मते, दीपा सणस, शिव धनुष्य प्रतिष्ठान पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष विनायक कालेकर, नितीन हेंद्रे यांच्यासह शेकडो शिवभक्त उपस्थित होते.
यानंतर छत्रपतींच्या मूर्तीची शिवभक्तानी शिव आरती केली. यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीत छत्रपतीची मूर्ती विराजमान झाली. तेथून ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या नामघोषात कार्यकर्त्यांनी पालखी शिवाई देवीच्या मंदिरात नेली. तिथे पारंपरिक पद्धतीने पूजा केल्यानंतर तेथून चांदीच्या पालखीत छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आली. यानंतर शिवभक्तांच्या जयघोषात पालखी नारायण गावाकडे मुक्कामासाठी गेली.
-----