शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रगटदिन उत्सवाला सुरूवात

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

शहरात प्रगट दिन उत्सवाला सुरुवात

शहरात प्रगट दिन उत्सवाला सुरुवात
नागपूर : श्री संत गजानन महाराज यांच्या १३७ व्या प्रगटदिन उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त शहरातील गजानन महाराजांच्या मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. काही मंदिरात आज पालखी सोहळ्याने प्रगटदिनाला सुरुवात झाली. महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काही मंदिरासह ठिकठिकाणी महाप्रसाद वितरित करण्यात आला.
रेशीमबाग, संत गजानन महाराज श्रद्धास्थान
संत गजानन महाराज श्रद्धास्थानाच्या ५१ व्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारोहाला प्रगटदिनापासून सुरुवात झाली. यानिमित्त महाराजांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शेगावप्रमाणे या श्रद्धास्थानावर भाविकांची श्रद्धा आहे. रथयात्रेचा शुभारंभ सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांच्याहस्ते झाला. यावेळी नासुप्रचे रविंद्र भोयर, आ. सुधाकर कोहळे व संतकवी कमलासूतबाबा उपस्थित होते. गण गण गणात बोतेच्या गजरात संपूर्ण रेशीमबाग परिसर दुमदुमला होता. रथयात्रेचे भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत के ले. श्रद्धास्थानात फुलांची सेज करण्यात आली होती. महाराजांचा लघुरुद्राभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
श्री संत गजानन महाराज मंदिर, बालाजीनगर
बालाजीनगर विस्तार येथे महाराजांच्या प्रगटदिन उत्सवाला सुरुवात झाली. विश्वशांती मानव सेवाश्रमातर्फे हा उत्सव साजरा करण्यात येतो. पहाटे ६ वाजता काकड आरती झाली. त्यानंतर घटस्थापना, कळस अनावरण व ब्रह्मदंडपूजन मोरेश्वर काकडे व डॉ. ओंकार लाडूकर यांच्याहस्ते करण्यात आले. भागवतकार विश्वनाथ आसेगावकर महाराजांच्या भागवत कथेला सुरुवात झाली. विश्वशांती महिला भजन मंडळ व जय माँ भगवती भजन मंडळाचे भजन झाले. तर हभप विश्वनाथ महाराज आसेगावकर यांचे कीर्तन झाले. दक्षिण नागपुरातील महाराजांचे हे सर्वात मोठे मंदिर आहे. महाराजांच्या मूर्तीची आज आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले.