शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

बीफ विक्री सुरू, खरेदीला गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 2:03 PM

पणजी : बेकायदेशीररित्या बिफ पकडले गेल्यानंतर राजधानीतील एक आठवडा बंद ठेवलेली दुकाने बिफ विक्रेत्यांनी कालपासून (शनिवारी) सुरू केली.

पणजी : बेकायदेशीररित्या बिफ पकडले गेल्यानंतर राजधानीतील एक आठवडा बंद ठेवलेली दुकाने बिफ विक्रेत्यांनी कालपासून (शनिवारी) सुरू केली. रविवारी वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बिफ खरेदीला लोकांची मोठी गर्दी दिसत होती. गेल्या आठवड्यात 25 डिसेंबर रोजी बेळगावहून बेकायदेशीररीत्या गोव्यात आणले जाणारे 130 किलो बिफ पकडले गेल्यानंतर राजधानीतील बीफ विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. सुमारे बारा लाख रुपयांचे हे मांस होते. ज्या बोलेरोतून हे बिफ आणले जात होते, त्या बोलेरोला पाटो येथे रात्री अपघात झाल्यानंतर ही बाब पुढे आली.हॉर्मोनी पशुसंवर्धन संस्थेच्या अधिका-यांनी या बीफची तपसाणी केल्यानंतर त्या वाहनचालकाकडे कत्तलखान्याचे अधिकृत प्रमाणपत्र, डॉक्टरांचे प्रमाणपत्र वगैरे काही सापडले नव्हते. त्यामुळे गोव्यात बेकायदेशीररीत्या बीफची वाहतूक होत असल्याचे त्या संस्थेच्या अधिका-यांना आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून चालकाला ताब्यात दिले.या कारवाईमुळे बेळगावच्या व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. बीफ विक्रीचा एका दुकानाचा व्यवसाय किमान 25 ते 30 हजार रुपयांचा असून, आठवडाभर दुकाने बंद ठेवली गेल्याने या लोकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. येथील काही व्यापा-यांनी कर्नाटकच्या पशुसंवर्धन खात्याच्या संचालकांची भेट घेऊन सुरक्षित बीफ पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला जाईल, असेही सांगितले आहे. दरम्यान, वर्षाचा आज शेवटचा दिवस असल्याने त्यातच नाताळाच्या सुट्ट्याही सुरू आहेत, याचे औचित्य साधून ख्रिश्चन बांधवांकडून बिफची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. सकाळी बेळगावहून बाजारात नेहमीप्रमाणे बीफ दाखल झाले आहे.

टॅग्स :goaगोवा