मधमाशीचा डंख! दुखणारा असला तरी, शेतकऱ्यांना ७० लाख रुपये मिळवून देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 15:06 IST2023-04-11T15:05:47+5:302023-04-11T15:06:34+5:30
डंखावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी ४ कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

मधमाशीचा डंख! दुखणारा असला तरी, शेतकऱ्यांना ७० लाख रुपये मिळवून देणार
मधमाशांचा डंख म्हणजे सहन न करता येणारा असतो. माणूस हा डंख कधीच विसरत नाही. खूप माशा चावल्या की अनेकदा मृत्यूही ओढवतो. मधमाशी पालन हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला जोडधंदा आहे. पोळ्याचे मेण आणि मध हे उत्पन्नाटा भाग आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर त्याहून मालामाल करणारा तिचा डंख आहे. विश्वास बसणार नाही, परंतू मधमाशांच्या डंखामुळे शेतकऱ्याला थोडेथोडके नव्हेत तर ७० लाख रुपये मिळू शकणार आहेत.
मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये या डंखावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी ४ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. इथे मधावर देखील प्रक्रिया केली जाणार आहे. मधाची गुणवत्ता देखील तपासली जाणार आहे. याचबरोबर मध पॅक करून तो विकला जाणार आहे. या प्रकल्पाची क्षमता १.५ टन आहे.
महात्मा गांधी सेवा आश्रमात हा प्रकल्प उभारला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मधाच्या यंत्रासोबत तिथे आणखी एक मशीन लावली जाणार आहे. याद्वारे मधमाशांचा डंख गोळा केला जाणार आहे. मधमाशीच्या डंखाला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. याची किंमत बाजारात ७० लाखांच्या आसपास असते.
डंख काढल्यानंतर मधमाशीच्या आयुष्यावर कोणतेही संकट येत नाही. मधमाशीच्या मधपासून ते मेणापर्यंत सारे काही औषधे बनविण्यासाठी वापरले जाते. या प्रकल्पामुळे शेतकरी मालामाल होणार आहे.