मंत्री होण्यापूर्वी मी सीए होतो, तुम्ही कोण आहात ?, पीयूष गोयल यांचा राहुल गांधींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 17:31 IST2018-05-01T17:31:28+5:302018-05-01T17:31:28+5:30

पदाचा कथित गैरवापर आणि कथित घोटाळ्याच्या आरोपामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना गोयल यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

Before becoming a minister, I was CA, who are you, Piyush Goyal's question to Rahul Gandhi | मंत्री होण्यापूर्वी मी सीए होतो, तुम्ही कोण आहात ?, पीयूष गोयल यांचा राहुल गांधींना सवाल

मंत्री होण्यापूर्वी मी सीए होतो, तुम्ही कोण आहात ?, पीयूष गोयल यांचा राहुल गांधींना सवाल

नवी दिल्ली- पदाचा कथित गैरवापर आणि कथित घोटाळ्याच्या आरोपामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना गोयल यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. ट्वीटरच्या माध्यमातून पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांना चांगलेच सुनावले असून, मी कामदार (कामगार) आहे तर तू नामदार (घराणेशाहीतून आलेल्या पदावरील व्यक्ती) आहात, अशी टीका केली आहे.

26 मे 2014 पर्यंत रोजी मी मंत्री झालो. त्यापूर्वी मी व्यावसायिक सनदी लेखापाल आणि इन्व्हेस्टमेंट बँकर होतो. तुमच्यासारखी काम न करता जगण्याची कला मी साधलेली नाही. मी कामदार आहे, नामदार नाही, अशा तिखट शब्दांमध्ये गोयल यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.


इतकेच नव्हे तर पीयूष गोयल यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांच्यावरही टीका केली आहे. पुढच्या ट्वीटमध्ये ते लिहितात, मी कायद्याचे शिक्षण घेताना पहिला आलो. सीएच्या परीक्षेत देशात दुसरा होतो. मी व्यावसायिक सनदी लेखापाल आणि इन्व्हेस्टमेंट बँकर आणि आर्थिक सल्ला देण्यासाठी सक्षम आहे. पी. चिदंबरम तुमचा मुलगा कार्ती चिदंबरम याला कोण सल्ले देत आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Web Title: Before becoming a minister, I was CA, who are you, Piyush Goyal's question to Rahul Gandhi