वयाच्या २२ व्या वर्षी बनली IPS, २८ व्या वर्षी दिला राजीनामा; ही 'लेडी सिंघम' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:02 IST2025-04-02T11:02:18+5:302025-04-02T11:02:54+5:30

काम्या मिश्रा यांचे पती अवधेश सरोज हेदेखील आयपीएस अधिकारी आहेत. सरोज २०२२ बॅचचे बिहार कॅडरचे पोलीस अधिकारी आहेत.

Became IPS at the age of 22, resigned at the age of 28; Know About 'Lady Singham' Kamya Mishra | वयाच्या २२ व्या वर्षी बनली IPS, २८ व्या वर्षी दिला राजीनामा; ही 'लेडी सिंघम' कोण?

वयाच्या २२ व्या वर्षी बनली IPS, २८ व्या वर्षी दिला राजीनामा; ही 'लेडी सिंघम' कोण?

नवादा - बिहारमध्ये आणखी एका आयपीएस अधिकाऱ्याने नोकरी सोडली आहे. आक्रमक आणि बेधडक असलेल्या आयपीएस काम्या मिश्रा यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. काम्या यांनी मागील वर्षी नोकरीचा राजीनामा दिला होता. कौटुंबिक कारण पुढे करत त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. याआधी बिहारमधीलच सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे यांनीही आयजीपदाचा राजीनामा देत नोकरी सोडली. काम्या मिश्रा ओडिशा इथल्या रहिवासी होत्या. त्या शिक्षणात फार हुशार होत्या. वयाच्या २२ व्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत यश मिळवत त्या IPS बनल्या होत्या. 

ऑगस्ट २०२४ मध्ये नोकरीचा राजीनामा

काम्या मिश्रा यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये आयपीएस नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही. आता राष्ट्रपती यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. काम्या मिश्रा या धाडसी पोलीस अधिकारी होत्या. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या काम्या यांनी ओडिशात त्यांचे शिक्षण पूर्ण केले. १२ वी परीक्षेत ९८ टक्के गुणांसह त्यांनी बोर्डाची परीक्षा पास केली. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेतही घवघवीत यश मिळवलं. काम्या केवळ २२ व्या वर्षीच आयपीएस बनली होती. त्यानंतर बिहार येथे पोस्टिंग मिळाली.

काम्या मिश्रा यांनी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्या चर्चेत आल्या कारण त्यांचे वय केवळ २८ वर्ष होते. २०१९ साली काम्या मिश्रा यांनी यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यांना देशात १७२ वी रँकिंग मिळाली. दिल्ली यूनिवर्सिटीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. सुरुवातीला काम्याला हिमाचल कॅडर मिळालं होते. त्यानंतर बिहार येथे त्यांची बदली झाली. काम्या मिश्रा यांचे पती अवधेश सरोज हेदेखील आयपीएस अधिकारी आहेत. सरोज २०२२ बॅचचे बिहार कॅडरचे पोलीस अधिकारी आहेत. या दोघांनी राजस्थानमध्ये लग्न केले होते. 

बिहारच्या दरभंगा येथे ग्रामीण एसपी पदावर असताना ऑगस्ट २०२४ साली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर दीर्घ सुट्टीवर त्या निघून गेल्या होत्या. काम्याचे वडील एक उद्योगपती आहेत. काम्या मिश्रा यांनी बिहार पोलीस दलात विविध पदावर काम केले आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे त्या लेडी सिंघम नावाने ओळखल्या जात होत्या. २०२४ साली माजी मंत्री मुकेश साहनीचे वडील जीतनराम हत्याकांडाचा कमी वेळातच त्यांनी खुलासा करून नावलौकिक मिळवलं होते.

Web Title: Became IPS at the age of 22, resigned at the age of 28; Know About 'Lady Singham' Kamya Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.