शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"राजकारण नको, अभिमान बाळगा...", नवीन संसद भवनावरून अभिनेता सोनू सूदची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 17:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर विरोधक सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत.

New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर विरोधक सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान या वास्तूचं उद्धघाटन करणार म्हणून विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. देशभरातील विविध राजकीय पक्षाचे नेते आपापली मतं मांडत आहेत. विरोधक लोकशाहीचा दाखला देत मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत, तर सत्ताधारी भाजप हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हणत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने 'अभिमान बाळगा, राजकारण नाही' अशी प्रतिक्रिया या दिली आहे. तसेच प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यानं म्हटले आहे.

राज्यासह देशभरातील विरोधकांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून मोदी सरकारवर टीका केली. यावर व्यक्त होताना सोनू सूदने एक सूचक विधान केल्याचे दिसते. "अभिमान बाळगा, राजकारण नाही. आज प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. जय हिंद", अशा आशयाचं ट्विट करत अभिनेत्यानं विरोधकांना फटकारलं.

शरद पवारांची टीका"सकाळी कार्यक्रम पाहिला. पण मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही. तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? हा कार्यक्रम फक्त मर्यादित लोकांसाठीच होता का?", अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.  

१४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब - मोदी नव्या वास्तूचं उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित केले. भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना झाल्या. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारे मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारा दुवा सिद्ध होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत, आपल्या देशाचा आणि तेथील लोकांचा विकास ही आपली प्रेरणा आहे. नवीन संसदेच्या उभारणीचा आपल्याला जसा अभिमान वाटतो, तसेच गेल्या ९ वर्षांत देशात ४ कोटी गरीब लोकांसाठी घरे आणि ११ कोटी शौचालये बांधल्याचा विचार करताना मला खूप समाधान मिळते. भारत ही लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदParliamentसंसदbollywoodबॉलिवूडNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा