शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरक्षित आहे का? चिनी हॅकर्स करताहेत व्हॉट्सअॅपला लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 18:10 IST

वापण्यास सुलभ असल्याने गेल्या काही काळात व्हॉट्सअॅप लोकप्रिय ठरले आहे. व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमधून अगदी गप्पांपासून ते ऑफीसमधील महत्त्वाच्या माहितीचीही देवाणघेवाण होत असते. मात्र व्हॉट्सअॅपवरील वैयक्तिक सुरक्षा धोक्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बंगळुरू - वापण्यास सुलभ असल्याने गेल्या काही काळात व्हॉट्सअॅप लोकप्रिय ठरले आहे. व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमधून अगदी गप्पांपासून ते ऑफीसमधील महत्त्वाच्या माहितीचीही देवाणघेवाण होत असते. मात्र व्हॉट्सअॅपवरील वैयक्तिक सुरक्षा धोक्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिनी हॅकर्सकडून व्हॉट्स अॅप हॅक करण्याचे प्रयत्न होत असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले असून, व्हॉट्सअॅपचा वापर करताना खबरदारी घेण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. 

सुमारे चार महिन्यांपूर्वी लष्कराने लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर तैनात असलेल्या जवानांना व्हॉट्सअॅपसह अनेक धोकादायक अॅपच्या वापराबाबत इशारा दिला होता. भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रविवारी एक  व्हिडिओ ट्विट करून चिनी हॅकर्सकडून व्हॉट्स अॅपला असलेल्या धोक्याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांना त्यासंदर्भातील खबरदारीचा इशाराही देण्यात आला आहेत. "व्हॉट्स अॅपवरील धोक्याबाबत सावध राहा, सतर्क राहा, सुरक्षित राहा, असे भारती लष्कर सोशल मीडियावरील योग्य आणि नियमबद्ध अकाऊंटला प्रोत्साहित करते. पण सध्या हॅकिंग जोरात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे व्हॉट्सअॅपचा वापर करताना खबरदारी घेत नाहीत. सोशल मीडिया नेहमी तपासून पाहा. व्यक्तिगत आणि ग्रुप अकाऊंटबाबत सावध राहा," असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपIndian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीनSocial Mediaसोशल मीडिया