शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

ठरलं! भवानीपूरमध्ये ममतांविरोधात BJPचं महिला कार्ड; जाणून घ्या, कोण आहेत भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 1:40 PM

Battle of bhawanipur : भाजपने एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात, टिबरेवाल यांच्याशिवाय, जंगीपूरमध्ये सुजीत दास तसेच, समरेसगंज येथे मिलन घोष यांना उमेदवारी दिली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी डावपेचांना सुरुवात झाली आहे. एकीकडे ममता बॅनर्जी आज भवानीपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर दुसरीकडे भाजपने प्रियांका टिबरेवाल (priyanka-tibrewal) यांना ममतांविरोधात उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या जागेसाठी भाजप एखाद्या वरिष्ठ नेत्याला उमेदवारी देईल, असा कयास लावला जात होता. मात्र, त्यांनी महिला कार्डावरच विश्वास दाखवला आहे. (West Bengal Battle of bhawanipur bjp played women card against Mamta Banerjee Know about the BJP leader priyanka tibrewal profile )

भाजपने एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात, टिबरेवाल यांच्याशिवाय, जंगीपूरमध्ये सुजीत दास तसेच, समरेसगंज येथे मिलन घोष यांना उमेदवारी दिली आहे.

ममता बॅनर्जींसाठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची आहे. कारण या निवडणुकीत त्यांचे मुख्यमंत्री पदच पणाला लागले आहे. यापूर्वी, मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम जागेववर सुवेंदू अधिकारी यांनी ममतांचा पराभव केला होता. मात्र, यानंतरही त्या मुख्यमंत्री झाल्या. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांच्या आत त्यांना आमदार होणे आवश्यक आहे. यामुळेच भवानीपूरची निवडणूक ममता बॅनर्जींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

कोन आहेत प्रियंका टिबरेवाल?भाजप नेते बाबुल सुप्रियो यांच्या कायदे विषयक सल्लागार असलेल्या प्रियंका तिबरीवाल यांनी ऑगस्ट 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले प्रेरणास्थान आणि राजकारणातील आदर्श मानतात. भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या सल्ल्यानंतरच प्रियंका भाजपमध्ये सामील झाल्या. 2015 मध्ये, प्रियांका तिब्रिवाल यांनी भाजपकडून कोलकाता नगरपरिषदेची निवडणूकही लढली होती. त्या प्रभाग क्रमांक 58 (अँटली) मधून उभ्या होत्या. परंतु तृणमूल काँग्रेसच्या स्वपन समदार यांच्याकडून त्यांचा पराभूत झाला होता. भाजपमधी सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली आणि ऑगस्ट 2020मध्ये त्यांना पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष करण्यात आले.

टिबरेवाल यांनी 2021 मध्ये अँटलीमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, टीएमसीचे स्वर्ण कमल साहा यांच्याकडून त्यांचा 58,257 मतांनी पराभव झाला होता. तिबरीवाल यांचा जन्म 7 जुलै 1981 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण वेलँड गोल्डस्मिथ स्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर, 2007 मध्ये त्यांनी कोलकात्ता विद्यापीठांतर्गत असलेल्या हजरा लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. यानंतर त्यांनी थायलंडमधून एमबीएही केले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाtmcठाणे महापालिका