शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चोरांचा पोलिसांना झटका, एका रात्रीत 80 गाड्यांच्या बॅट-या चोरुन झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 12:12 IST

एका सीसीटीव्हीत चोर कैद झाले असून, कारमधून आलेले चोर बोनेट खोलून बोनेट चोरी करताना दिसत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. 

गाझियाबाद - 24 तास पेट्रोलिंग करत शहरात कडक सुरक्षाव्यवस्था असल्याचा पोलिसांचा दावा रविवारी फोल ठरला. गोविंदपुरमसारख्या पॉश परिसरात चोराने एकाच रात्रीत 80 गाड्यांची बॅटरी चोरी केली आणि पोलिसांना साधा याचा सुगावाही लागला नाही. सोमवारी सकाळी जेव्हा लोकांच्या लक्षात आलं, तेव्हा एकच गोंधळ उडाला. चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला. एका सीसीटीव्हीत चोर कैद झाले असून, कारमधून आलेले चोर बोनेट खोलून बोनेट चोरी करताना दिसत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. 

पोलीस अधिकारी समरजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच याआधी कारची बॅटरी चोरी प्रकरणात अटक झालेल्या चोरांची माहितीही तपासली जात आहे. एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी गोविंदपुरम जी ब्लॉकच्या गल्ली क्रमांक 2,3,4, 5 सहित अन्य परिसरांमध्ये झाली आहे. सर्वात जास्त बॅट-यांची चोरी दोन नंबरच्या गल्लीत झाली आहे. येथून चोरांनी जवळपास 20 कारमधून बॅटरी चोरुन नेली आहे. ज्या कारमधून बॅटरी चोरी झाल्या आहेत, त्यामधील 80 टक्के कार मारुतीच्या आहेत अशी माहिती लोकांनी दिली आहे. 

कॅमे-यात कैद झाले चोर येथे लावण्यात आलेल्या एका सीसीटीव्हीत चोरी कैद झाली आहे. सीसीटीव्हीत चोर एका स्विफ्ट कारमधून रात्री जवळपास दोन वाजता गोविंदपुरम येथे पोहोचल्याचं दिसत आहे. कारमधून उतरल्यानंतर चोरांनी कारचं बोनेट खोलून त्यातून बॅटरी काढली. पोलिसांकडे फक्त एकाच ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बॅटरी चोरी करण्यासाठी चोरांनी मोठ्या गाडीचा वापर केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. यासाठी पोलीस इतर ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. 

500 ते 1000 रुपयांत विकली जाते बॅटरीयाआधी अटक करण्यात आलेल्या चोरांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की, कारच्या बॅटरी दिल्ली आणि मेरठ मार्केटमध्ये विकल्या जातात. 500 ते 1000 रुपयांमध्ये या बॅट-या विकत घेतल्या जातात. 

टॅग्स :theftचोरीCrimeगुन्हाPoliceपोलिस