आधारवरून खासदाराचा भाजपाला घरचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 03:58 IST2017-12-30T03:58:15+5:302017-12-30T03:58:23+5:30
आधारकार्डच्या उपयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा अजून यायचा असला तरी भाजपाच्याच एका खासदाराने सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे.

आधारवरून खासदाराचा भाजपाला घरचा अहेर
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : आधारकार्डच्या उपयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा अजून यायचा असला तरी भाजपाच्याच एका खासदाराने सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. आधार अनिवार्य केल्यामुळे बिहारमध्ये एक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळू शकत नाही. कारण आधार कार्ड बनवले तेव्हाचे बोटांचे ठसे व वय वाढल्यामुळे आता जुळत नाहीत, अशी तक्रार खासदार सुशील कुमार सिंह यांनी केली आहे.
सिंह यांनी सांगितले की, आईच्या बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे तिला सिमकार्डही मिळू शकत नाही.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ७१.२४ कोटी मोबाइल नंबर, १४.६३ पॅनकार्ड व ८२ कोटी बँक खाती आधारशी जोडली गेली आहेत. मार्च २०१८ पर्यंत आधारला लिंक करण्याची मुदत वाढवून दिल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असले तरी बँक किंवा अन्य सेवा देणारे लाभार्थीला आधार लिंक करण्यासाठी दबाव व दडपण आणून भाग पाडत आहेत.