शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: July 30, 2016 05:14 IST

सरकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी एक दिवसाच्या संपावर गेल्यामुळे शुक्रवारी देशभरातील ८0 हजार बँक शाखांतील व्यवहार ठप्प झाले. सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये

नवी दिल्ली : सरकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी एक दिवसाच्या संपावर गेल्यामुळे शुक्रवारी देशभरातील ८0 हजार बँक शाखांतील व्यवहार ठप्प झाले. सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेसह अन्य खाजगी क्षेत्रांतील बँका मात्र नेहमीप्रमाणे सुरू होत्या. एसबीआयसह सर्व सरकारी मालकीच्या बँकांनी या संपाची कल्पना ग्राहकांना आधीच दिली होती. त्यामुळे या बँकांच्या कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या शिखर संघटनेच्या नेतृत्वाखाली आजचा संप करण्यात आला. सुमारे ८ लाख कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाले होते. संपामुळे धनादेश क्लीअरन्सची सुविधा पूर्णत: ठप्प झाल्याचे दिसून आले. याशिवाय संबंधित शाखांतील पैसे काढणे आणि भरण्याचे व्यवहारही पूर्णत: बंद होते. आॅल इंडिया स्टेट बँक आॅफिसर्स फेडरेशन आणि आॅल इंडिया स्टेट बँक आॅफ इंडिया स्टाफ फेडरेश या एसबीआयच्या प्रमुख कर्मचारी-अधिकारी संघटना संपात सहभागी होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)संपामुळे १५ हजार कोटींच्या व्यवहारांवर परिणामसरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशभरातील सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतात, असे प्रतिपादन औद्योगिक संघटना असोचेमने केले आहे. असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी सांगितले की, सरकारी बँकांचा नफा खाजगी बँकांच्या तुलनेत आधीच कमी आहे. संपामुळे त्यांना आणखी नुकसान होऊ शकते. या बँकांच्या कामकाजात सुधारणा आणण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील सुधारणांची गरज आहे.