केओंझार (ओडिशा) : बहीण गेली, तिच्या बँक खात्यातील पैसे काढायचे म्हणून भावाने बँकेत खेटे घातले. पण, पुरावा म्हणून ‘हे आणा ते आणा’ किंवा खातेदारालाच घेऊन या, असे अधिकारी सांगत राहिले. शेवटी भावाने चक्क बहिणीचा सांगाडाच बँकेत आणला.
केओंझार जिल्ह्यात जीतू मुंडा या आदिवासीच्या मृत बहिणीच्या खात्यात २० हजार रुपये होते. तिच्या पतीचा व मुलाचाही मृत्यू झाल्याने जीतू हाच वारस होता. पण बँक पुरावे मागत होती.
खांद्यावर सांगाडा अन् ३ किमी पायी प्रवास
बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन जीतू ३ किमी चालत बँकेत पोहोचला. बँकेत पोहोचल्यावर त्याने सांगाड्यावर झाकलेला कपडा हटवला आणि प्रचंड गोंधळ उडाला. बँक कर्मचाऱ्यांनी जीतूला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. शेवटी पोलिसांना बोलवावे लागले.
पोलिसांनी जीतूला बहिणीच्या नावे असलेले पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही यात लक्ष घालून जीतूला पैशाची हमी दिली नंतर बँकेत आणलेला सांगाडा पुन्हा स्मशानभूमीत नेऊन दफन करण्यात आला.
तत्काळ निपटारा करू : बँकेचे स्पष्टीकरणइंडियन ओव्हरसीज बँकेने मंगळवारी जीतू यांच्या बहिणीचे मृत्यू प्रमाणपत्र बँकेत दाखल होताच त्यांच्या दाव्याचा प्राधान्यक्रमाने निपटारा केला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.
Web Summary : Frustrated with bank demands for proof, an Odisha man carried his deceased sister's skeleton three kilometers to the bank to claim her savings. Authorities intervened, promising the funds and ensuring proper burial.
Web Summary : ओडिशा में बैंक के सबूत मांगने से परेशान होकर, एक आदमी अपनी मृत बहन का कंकाल तीन किलोमीटर दूर बैंक ले गया ताकि उसकी बचत का दावा कर सके। अधिकारियों ने हस्तक्षेप किया, धन का वादा किया और उचित दफन सुनिश्चित किया।