बँक संपामुळे कामकाज ठप्प, एक लाख कोटींचा मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 06:15 IST2026-01-28T06:15:05+5:302026-01-28T06:15:26+5:30
Bank strike : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कडकडीत संपामुळे एका दिवसात तब्बल एक लाख कोटी रुपयांचे व्यवहार खोळंबले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. बॅंकांमध्ये पाच दिवस कामकाजाचा आठवडा लागू करावा, अशी बँक कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

बँक संपामुळे कामकाज ठप्प, एक लाख कोटींचा मोठा फटका
- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कडकडीत संपामुळे एका दिवसात तब्बल एक लाख कोटी रुपयांचे व्यवहार खोळंबले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. बॅंकांमध्ये पाच दिवस कामकाजाचा आठवडा लागू करावा, अशी बँक कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी बंदचे आवाहन केले होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला होता. यात सर्व नऊ संघटना सामील झाल्यामुळे देशभरात बँकांचे कार्यालय बंद होते. बँकांच्या शाखांमध्ये रोख रक्कम जमा करणे, काढणे, धनादेशांची पूर्तता आणि प्रशासकीय काम यांसारख्या सेवा आज प्रभावित झाल्या.