bank manager dies after got false covid 19 test report in kolkata | बँक व्यवस्थापकाचा तयार केला बनावट कोरोना चाचणी अहवाल, तीन दिवसांनंतर मृत्यू 

बँक व्यवस्थापकाचा तयार केला बनावट कोरोना चाचणी अहवाल, तीन दिवसांनंतर मृत्यू 

ठळक मुद्देबँक व्यवस्थापकाच्या चाचणी अहवालावर 9-अंकी कोड हा हाताने लिहिला आहे.

कोलकाता : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग टाळण्यासाठी कोरोना  बाधित आणि संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी करण्यात येत आहे. मात्र, असे असूनही काही लोक याबाबत निष्काळजी घेत आहेत. कोलकातामध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका ५७ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, या बँक व्यवस्थापकाने कोरोना चाचणीही केली होती. त्यावेळी त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह देण्यात आला होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. बँक व्यवस्थापक बिमल सिन्हा यांच्या पत्नीने दिलेल्या अनेक तक्रारींच्या आधारे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमधील लोकांनी आणखी कोणाला बनावट अहवाल दिले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

बँक व्यवस्थापकाच्या चाचणी अहवालावर 9-अंकी कोड हा हाताने लिहिला गेला आहे. हा कोड १३ अंकांचा असतो, हा अहवाल नकली आहे, असे कोलकाता येथील एमआर बांगूर हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. तर बँक व्यवस्थापक बिमल सिन्हा यांना ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, फॅमिली डॉक्टरांनी त्यांना पॅथॉलॉजिकल लॅब चालवणाऱ्या एका व्यक्तीकडे पाठविले. या लॅब टेक्‍नीनिशियनच्या मदतीने घरातून नमुने घेण्यात येत होते, असे पोलिसांनी सांगितले.

ज्यावेळी कुटुंबीयांनी लॅबशी संपर्क केला. त्यावेळी एका व्यक्तीला नमुने घेण्यासाठी घरी पाठविले. 24 जुलै रोजी त्यांनी नमुना घेतला आणि 25 जुलै रोजी बिमल यांच्या पत्नीला फोन करून सांगितले की, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत तपास अहवाल मागितला असता त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. मात्र, नंतर त्यांनी अहवाल पाठविला. त्यामध्ये हाताने लिहिलेला कोड होता, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर बिमल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अहवालावर डॉक्टरांनी शंका उपस्थित केली आणि पुन्हा त्यांची चाचणी केली. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपचारादरम्यान 30 जुलै रोजी त्यांचे निधन झाले.

आणखी बातम्या....

Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"     

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bank manager dies after got false covid 19 test report in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.