बांगलादेशातून एक तास पोहत भारतात आली 22 वर्षांची प्रेयसी! प्रियकरासोबत केलं लग्न, आता अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 20:28 IST2022-06-01T20:20:24+5:302022-06-01T20:28:20+5:30
कृष्णा भारतातील आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी प्राण्यांनी भरलेले सुंदरबन डेल्टा पार करून पश्चिम बंगालमध्ये आली आहे.

बांगलादेशातून एक तास पोहत भारतात आली 22 वर्षांची प्रेयसी! प्रियकरासोबत केलं लग्न, आता अटक
लोक प्रेमात काहीही करू शकतात! बांगलादेशातूनभारतात आलेल्या 22 वर्षीय कृष्णा मंडलची लव्ह स्टोरी ऐकूण आपणही असेच म्हणाल. कृष्णा भारतातील आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी प्राण्यांनी भरलेले सुंदरबन डेल्टा पार करून पश्चिम बंगालमध्ये आली आहे. एवढेच नाही, तर तिने आपल्या प्रियकराशी लग्नही केले आहे. मात्र, सध्या पोलिसांनी तिला अटक केली आहे. यानंतर आता पोलीस तिला पुन्हा बांगलादेशात पाठविण्याची तयारी करत आहेत.
काही दिवसांपूर्वी कृष्णा मंडल हिचे फेसबूकच्या माध्यमाने भारतात राहणाऱ्या प्रियकर आशिक मंडलसोबत मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. कृष्णाकडे पासपोर्ट नव्हता. यामुळे तिला भारतात प्रवेश मिळत नव्हता. यानंतर त्रस्त झालेल्या कृष्णाने सुंदरबन डेल्टा पोहून भारतात येण्याचा निर्णय घेतला.
पत्नीला अटक, पती अस्वस्थ -
कृष्णा साधारणपणे एक तास नदीत पोहून भारतात पोहोचली. तिने गेल्या आठवड्यात कोलकात्यातील एका मंदिरात लग्न केले. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कृष्णाला अटक केली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णाकडे भारतात येण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नाहीत. तिला बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आता कृष्णाचा पती आशिक मंडल अस्वस्थ असून कायदेशीर मदत घेण्याचा विचार करत आहे.