बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 08:27 AM2024-05-25T08:27:10+5:302024-05-25T08:27:30+5:30

या खासदाराचा मृतदेह अद्याप सापडला नसून मारेकऱ्यांनी त्याचे तुकडे करून ते अनेक ठिकाणी फेकून दिले असावेत, अशीही शक्यता आहे.

Bangladesh MP caught in honey trap; 5 crore betel nut was given by the friend for the murder | बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी

बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी

कोलकाता : बांगलादेशमधील अवामी लीग या पक्षाचे खासदार अन्वरऊल अझीम अनार यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते, असा कोलकाता पोलिसांचा कयास आहे. 

या खासदाराचा मृतदेह अद्याप सापडला नसून मारेकऱ्यांनी त्याचे तुकडे करून ते अनेक ठिकाणी फेकून दिले असावेत, अशीही शक्यता आहे.  त्यांना शिलास्ती रेहमान नावाच्या महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकविले व त्यानंतर त्यांची हत्या केली असावी.  मारेकऱ्यांपैकी एकाची ती प्रेयसी हाेती. तिनेच खासदाराला मारेकऱ्यांपर्यंत पाेहाेचविल्याचा संशय आहे. या महिलेसह जिहाद हवालदार यालाही बांगलादेश पाेलिसांनी पश्चिम बंगालमधून बेड्या ठाेकल्या आहेत. अझीम अनार यांची हत्या करणारा जिहाद हवालदार हा दोन महिन्यांपूर्वी कोलकाता येथे आला होता. खासदार येण्याच्या दोन महिने आधीच तो या शहरात आला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

Web Title: Bangladesh MP caught in honey trap; 5 crore betel nut was given by the friend for the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.