बांगलादेशने दिला भारताला धक्का, हवाई क्षेत्र वापरण्यास स्पाइसजेटला केली मनाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:58 IST2026-02-20T10:57:58+5:302026-02-20T10:58:49+5:30
बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे हवाई क्षेत्र उपलब्ध नसल्याने कोलकाता येथून गुवाहाटी व इंफाळला जाणाऱ्या काही विमानांना लांब हवाई मार्गाने उड्डाण करावे लागत आहे.

बांगलादेशने दिला भारताला धक्का, हवाई क्षेत्र वापरण्यास स्पाइसजेटला केली मनाई
नवी दिल्ली : बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या सरकारने भारतातील विमान कंपनी स्पाइसजेटसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. स्पाइसजेटने अद्याप प्रलंबित थकबाकी परत केली नसल्याने ही कारवाई केली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे हवाई क्षेत्र उपलब्ध नसल्याने कोलकाता येथून गुवाहाटी व इंफाळला जाणाऱ्या काही विमानांना लांब हवाई मार्गाने उड्डाण करावे लागत आहे. त्यामुळे विमानाच्या वेळेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. विमान कंपनीच्या विमान वाहतुकीशी संबंधित शुल्कासह इतर बाबींवर नियमित चर्चा सुरू आहे, असे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.
थकबाकी स्वरूपाबाबत अधिकृत तपशील नाही
प्रलंबित थकबाकी न भरल्यामुळे बांगलादेशने स्पाइसजेटला त्यांचे हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई केली आहे. थकबाकीचे स्वरूप काय आहे, याबाबत अधिकृत तपशील समोर आलेला नाही. बांगलादेशच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानेदेखील अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही.