बेडवर कुत्रा अन् ट्रॉमा सेंटरमध्ये फिरतेय गाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 17:33 IST2023-01-05T17:26:59+5:302023-01-05T17:33:59+5:30
जिल्हा रुग्णालयातील या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटर वॉर्डमध्ये कुत्रे आणि गायी आरामात फिरताना दिसत आहेत.

बेडवर कुत्रा अन् ट्रॉमा सेंटरमध्ये फिरतेय गाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक Video व्हायरल
उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांदा जिल्हा रुग्णालयातील या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटर वॉर्डमध्ये कुत्रे आणि गायी आरामात फिरताना दिसत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करत बांदा जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा देखील पाहायला मिळत आहे. या संदर्भात जिल्हा रुग्णालयाच्या सीएमएसला विचारलं असता दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ हे बांदा जिल्हा रुग्णालयातील आहेत. व्हिडिओ आणि फोटोमध्ये ट्रॉमा सेंटरमध्ये रुग्णाच्या बेडवर कुत्रा बिस्किट खात आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच गाय रुग्णांच्या वॉर्डमध्ये फिरताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना रुग्णालयातून हाकलताना, बाहेर काढताना एकही आरोग्य कर्मचारी दिसत नाही.
अशा स्थितीत जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन या रुग्णालयात होणे गरजेचे नाही का? असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या संदर्भात जिल्हा रुग्णालयाच्या सीएमएसशी बोलले असता त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ माझ्याही निदर्शनास आला असून, आता भटकी जनावरे इथपर्यंत कशी पोहोचली, याबाबत मी चौकशी करत आहे आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे भटके कुत्रे आणि गायींचे व्हिडीओ नवीन नाहीत. याआधीही येथून असेच फोटो समोर आले आहे. एवढेच नाही तर या प्रकरणी यापूर्वीही वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"