म्हसुर्ली सरपंचपदी बाळू बांगारे, तर उपसरपंचपदी संदीप तांबे बिनविरोध!

By Admin | Updated: May 8, 2014 21:08 IST2014-05-08T21:08:12+5:302014-05-08T21:08:12+5:30

त्र्यंबकेश्वर : इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली येथील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झालेल्या सरपंच व उपसरपंचाची निवड प्रक्रिया नुकतीच जाहीर झाली. यावेळी सरपंचपद अनु. जमात राखीव असल्याने सरपंचपदी बाळू सोमा बांगारे यांची तर उपसरपंचपदी संदीप लखुजी तांबे यांची निवड बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी बिवे यांनी दोन्हीही जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा केली.

Balh bangare of masurli sarpanch, Sandeep copper in sub-panchayat is uncontested! | म्हसुर्ली सरपंचपदी बाळू बांगारे, तर उपसरपंचपदी संदीप तांबे बिनविरोध!

म्हसुर्ली सरपंचपदी बाळू बांगारे, तर उपसरपंचपदी संदीप तांबे बिनविरोध!

र्यंबकेश्वर : इगतपुरी तालुक्यातील म्हसुर्ली येथील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झालेल्या सरपंच व उपसरपंचाची निवड प्रक्रिया नुकतीच जाहीर झाली. यावेळी सरपंचपद अनु. जमात राखीव असल्याने सरपंचपदी बाळू सोमा बांगारे यांची तर उपसरपंचपदी संदीप लखुजी तांबे यांची निवड बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी बिवे यांनी दोन्हीही जागांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा केली.
इगतपुरी तालुक्यातील पण त्र्यंबकेश्वरनजीक असलेल्या म्हसुर्ली गाव शेतीनिष्ठ आणि राजकीयदृष्ट्या पुढारलेले आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती व दूध विक्रीचा आहे. ग्रामपंचायतीचे सात सदस्य असून, राष्ट्रवादी व सेना मिळून सत्ता स्थापन झालेली आहे. सदस्य निवडीची घोषणा २३ एप्रिलला झाली. सरपंच व उपसरपंच निवड घोषित करण्यात आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बाळू सोमा बांगारे (राष्ट्रवादी) यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत संदीप तांबे या उपसरपंचपदासाठी सूचक म्हणून जगन्नाथ शिवाजी पोटकुळे यांनी स्वाक्षरी केली.
निवड प्रक्रिया बिनविरोधरीत्या पार पडली. यावेळी शांताराम तांबे, सुरेश तांबे, किसन तांबे, विष्णू क्षीरसागर, गणपत तांबे, संजय तांबे, देवीदास वारुंगसे, किसन वारुंगसे, गोरख तांबे, शरद तांबे, योगेश पारधी, राजाराम तांबे, निवृत्ती गिर्‍हे, सदू मुकणे, विष्णु मुकणे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Balh bangare of masurli sarpanch, Sandeep copper in sub-panchayat is uncontested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.