SP आमदाराच्या मुलीसोबत स्वत:च्या मुलाचं लग्न लावणं बसपा नेत्याला महागात पडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:58 IST2024-12-06T11:56:45+5:302024-12-06T11:58:32+5:30

बरेली मंडलमध्ये सुरेंद्र सागर हे बसपाचे मोठे नेते मानले जायचे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Bahujan Samaj Party leader expelled from party for arranging son's marriage with Samajwadi Party MLA daughter | SP आमदाराच्या मुलीसोबत स्वत:च्या मुलाचं लग्न लावणं बसपा नेत्याला महागात पडलं

SP आमदाराच्या मुलीसोबत स्वत:च्या मुलाचं लग्न लावणं बसपा नेत्याला महागात पडलं

लखनौ - ५ वेळा रामपूर जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहिलेले सुरेंद्र सागर यांना पक्षाच्या नेत्या मायावती यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. सुरेंद्र सागर यांनी त्यांच्या मुलाचं लग्न समाजवादी पक्षाचे आमदार त्रिभुवन दत्त यांच्या मुलीशी लावलं. त्रिभुवन दत्त हे एकेकाळी बहुजन समाजावादी पक्षाचे खासदार होते परंतु आता ते समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. त्रिभुवन दत्त यांच्या मुलीचं लग्न सुरेंद्र सागर यांच्याशी मुलाशी झाल्याने मायावती यांनी सुरेंद्र सागर यांची पक्षातून हकालपट्टी केली.

अलीकडेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे त्रिभुवन दत्त यांच्या आंबेडकर नगरमधील घरी आले होते. आता मायावती यांनी सुरेंद्र सागर यांच्यासोबतच प्रमोद सागर यांनाही पक्षातून बाहेर काढले. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुरेंद्र सागर यांच्या जागी ज्ञानप्रकाश बौद्ध यांना नवीन जिल्हाध्यक्ष बनवण्यात आलं आहे. बरेली मंडलमध्ये सुरेंद्र सागर हे बसपाचे मोठे नेते मानले जायचे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. २०२२ मध्ये मिलक विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.

तर मी कुठल्याही पक्ष शिस्तीचा भंग केला नाही.  केवळ माझा मुलगा अंकुरचं लग्न समाजवादी पक्षाचे आमदार त्रिभुवन दत्त यांच्याशी मुलीशी केले आहे असं सुरेंद्र सागर यांनी सांगितले. त्याशिवाय याआधी मुनकाद अली यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर माजी मंडल प्रधान प्रशांत गौतम यांनाही मायावती यांनी पक्षाबाहेर काढले होते. बसपाचे समन्वयक मुनकाद अली यांची मुलगी खासदार कादिर राणा यांची सून आहे आणि या पोटनिवडणुकीत त्या मीरापूर येथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या.

दरम्यान, बसपाने मुनकाद अली यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी इतर पदाधिकाऱ्यांनाही पक्षाबाहेर काढलं कारण तेव्हा विधानसभेची पोटनिवडणूक होती. मुनकाद अली यांच्या मुलीच्या लग्ना समाजवादी पक्षाचे उमेदवारही पोहचण्याची शक्यता होती. समाजवादी नेतेही तिथे पोहचले होते. समाजवादी पक्षाच्या नेत्यांसोबत अशाप्रकारे संबंध ठेवणे हे अजिबात सहन केले जाणार नाही अशी भूमिका बसपाने घेतली होती. त्यावेळी एक ऑडिओही व्हायरल झाला होता ज्यात बसपा नेते मेवालाल गौतम यांनी पक्षातील नेत्यांना लग्नाला जाऊ नका अशा सूचना दिल्या होत्या. 
 

Web Title: Bahujan Samaj Party leader expelled from party for arranging son's marriage with Samajwadi Party MLA daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.