Bags on Wheels! Passengers arrive at the train station empty-handed; Railway's scheme | चिंता सोडा! प्रवाशांनो रिकाम्या हातांनी स्थानकावर या; रेल्वे अवजड बॅगा पोहोचविणार

चिंता सोडा! प्रवाशांनो रिकाम्या हातांनी स्थानकावर या; रेल्वे अवजड बॅगा पोहोचविणार

भारतीय रेल्वे पहिल्यांदाच बॅग्स ऑन व्हील ही सेवा देण्याची तयारी करत आहे. उत्तर रेल्वेच्या दिल्ली मंडळाच्या रेल्वे प्रवाशांसाठी अॅप आधारित बॅग्स ऑन व्हील सेवा सुरु करण्यात आली आहे. विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजीव चौधरी यांनी सांगितले की, रेल्वे महसूल वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. यानुसार दिल्ली विभागामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सामान त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. ही अशाप्रकारची पहिलीच सेवा आहे. 


BOW (Bags on Wheels) अॅप अँड्रॉईड आणि आयफोनवरही वापरता येणार आहे. या अॅपवरून रेल्वे प्रवासी त्यांच्या घरातून रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावरून त्यांच्या घरापर्यंत बॅगा किंवा सामान पोहोचविण्याचे काम होणार आहे. यासाठी प्रवाशांना त्यांचा बुकिंगनुसार कोच क्रमांक, सीट क्रमांक आणि घराचा पत्ता द्यावा लागणार आहे. रेल्वेने निवडलेला ठेकेदार प्रवाशांचे सामान सुरक्षितपणे त्या ठिकाणी नेऊन देणार आहे. म्हणजेच या अॅपवर बुकिंग केल्यास प्रवाशांना रिकाम्या हातांनीच रेल्वे स्थानक किंवा घरी जायचे आहे. बॅगा उचलून टॅक्सीत टाकणे किंवा सांभाळण्याची कटकट वाचणार आहे. 


रेल्वे यासाठी कमी पैसे आकारणार आहे. कमी शुल्क घेऊन डोअर-टू-डोअर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. प्रवाशाच्या घरातून त्याचे समान रेल्वे कोच तसेच रेल्वे कोचमधून प्रवाशाचे सामान त्याच्या घरी पोहोच केले जाणार आहे. य़ा योजनेचा फायदा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना होणार आहे. 


रेल्वे प्रवास सुरु होण्याआधी पोहोचणार 
महत्वाचे म्हणजे रेल्वे प्रवास सुरु होण्याआधी प्रवाशाला त्याच्या बॅगा मिळणार आहेत. यामुळे प्रवाशाला रेल्वे फलाट ओलांडताना मोठमोठ्या बॅगा उचलणे, रेल्वे पकडण्यासाठी पळापळ आदी कटकटींतून मुक्तता मिळणार आहे. सुरुवातीला ही सेवा नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन, दिल्ली छावणी, दिल्ली सराय रौहिल्ला, गाझियाबाद आणि गुरुग्राम रेल्वे स्थानकांवर मिळणार आहे. या सेवेमुळे रेल्वेला वर्षाला अतिरिक्त 50 लाखांचा  निधी मिळणार आहे. पॅलेस ऑन व्हिल्स नंतर आता बॅग्स ऑन व्हील्स सेवाचा आनंद मिळणार आहे. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bags on Wheels! Passengers arrive at the train station empty-handed; Railway's scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.