Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:47 IST2025-11-14T14:46:41+5:302025-11-14T14:47:32+5:30
Bihar Election 2025 Result: जनतेचा आशीर्वाद हाच खरा विजय आहे, असे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.

Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
Bihar Election 2025 Result:बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता २०० जागांच्या दिशेने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या ३९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयी आघाडीचा देशभरात जल्लोष केला. यातच विरोधकांनी टीका केली आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीत जनता नेहमी सर्वोपरी असते. देश आणि समाजाच्या हितासाठी काम करणारे सरकार स्थापन व्हावे, अशी इच्छा आहे. आम्ही लोकांना फक्त इतकेच सांगतो की, तुम्ही ज्याला आपला नेता मानाल, तो राष्ट्र, धर्म आणि समाजासाठी समर्पित असावा. जनतेचा आशीर्वाद हाच खरा विजय आहे, असे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.
सनातन संस्कृतीला पुढे नेणारी शक्ती सत्तेत यावी
बिहारमध्ये तोच पक्ष जिंकेल ज्याला जनतेने मनापासून मतदान केले आहे. आम्ही फक्त एवढीच इच्छा व्यक्त करतो की, राष्ट्रवादी विचारधारेला आणि सनातन संस्कृतीला पुढे नेणारी शक्ती सत्तेत यावी. जनता खरोखरच आपले नेतृत्व कोणाच्या हाती सोपवते. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, बिहारमध्ये ज्याला जनतेने मत दिले असेल, तोच जिंकेल. जनतेचा आशीर्वाद सर्वात मोठा असतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, १ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार, एनडीएत घटक पक्ष असलेल्या भाजपाचे ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ८१ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे २६ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत.