कॉलेजमधील कोचची विकृती, तरुणीकडे नग्न फोटोंची मागणी; नकार देताच गुपचूप काढले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 15:45 IST2023-11-23T15:41:22+5:302023-11-23T15:45:41+5:30

बॅडमिंटन कोचने कॉलेज तरुणीचे नग्न फोटो काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Badminton coach clicks nude pictures of college girl accused arrested by police | कॉलेजमधील कोचची विकृती, तरुणीकडे नग्न फोटोंची मागणी; नकार देताच गुपचूप काढले फोटो!

कॉलेजमधील कोचची विकृती, तरुणीकडे नग्न फोटोंची मागणी; नकार देताच गुपचूप काढले फोटो!

कोईम्बतूर : तामिळनाडूतील कोईम्बतूर या शहरातील एका कॉलेजमधून संतापजनक घटना समोर आली आहे. कॉलेजमध्ये ब्रँडमिंटन प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या नराधमाने ११वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या तरुणीकडे नग्न फोटोंची मागणी केली. तसंच तरुणीने नकार दिल्यानंतर कपडे बदलताना गुपचूप तिचे फोटो काढले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डी. अरुण (वय २८) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोईम्बतूर येथील एका खासगी कॉलेजमध्ये डी. अरुण हा मागील सहा महिन्यांपासून हंगामी बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून काम पाहात होता. अरुणने ११वीत शिकणाऱ्या एका तरुणीला व्हॉट्सअॅपवर तिचे फोटो पाठवण्यास सांगितलं. त्यानंतर तरुणीने स्वत:चे फोटो त्याला पाठवले. मात्र नंतर तो सदर तरुणीला तिचे नग्न फोटो पाठवण्याची मागणी करू लागला. बॅडमिंटन प्रशिक्षकाच्या या कृत्याने घाबरलेल्या तरुणीने असे फोटो पाठवण्यास नकार दिला.

तरुणीने फोटो पाठवण्यास नकार दिल्यानंतर आरोपी अरुण याने सदर तरुणीचे कॉलेज परिसरात कपडे बदल असताना फोटो काढले. हा प्रकार पीडितेच्या लक्षात येताच तिने याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली आणि बुधवारी सायंकाळी पोलीस स्टेशन गाठले. पीडित तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलीस कारवाईनंतर कॉलेज प्रशासनानेही डी. अरुण याची बॅडमिंटन प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, सदर आरोपीची विकृती दाखवणाऱ्या इतर घटनाही आता समोर येऊ लागल्या आहेत. आरोपी अरुण याने कॉलेजमधील इतरही पाच मुलींशी गैरवर्तन करत त्यांच्याकडे नग्न फोटोंची मागणी केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Web Title: Badminton coach clicks nude pictures of college girl accused arrested by police