बदायूँ बलात्कार प्रकरण; पोलीस कॉन्स्टेबल जेरबंद
By Admin | Updated: January 6, 2015 23:56 IST2015-01-06T23:56:02+5:302015-01-06T23:56:02+5:30
नववर्षाच्या पूर्वसंध्येला बदायू जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी एका कॉन्स्टेबलला मंगळवारी पहाटे बरेली रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली.

बदायूँ बलात्कार प्रकरण; पोलीस कॉन्स्टेबल जेरबंद
बरेली: नववर्षाच्या पूर्वसंध्येला बदायू जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी एका कॉन्स्टेबलला मंगळवारी पहाटे बरेली रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. या प्रकरणात दोन कॉन्स्टेबल आरोपी आहेत.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजीव मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अवनीश यादव याला उत्तर प्रदेश पोलीस विशेष कृती दल आणि स्थानिक पोलिसांनी तो रेल्वेगाडीत बसून फरार होण्याच्या तयारीत असताना अटक केली. दुसरा आरोपी वीरपालसिंग यादवचा शोध सुरू आहे.
१४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर दोघेही आरोपी कॉन्स्टेबल फरार झाले. त्यांना शोधण्याची जबाबदारी विशेष कृती दलावर सोपविण्यात आली आहे. आरोपींना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर सरकारने घटनेच्या दिवशी ठाण्यात तैनात रात्रपाळीचे प्रभारी हिमांशु शुक्ला आणि हेडकॉन्स्टेबल उदयवीर सिंह यांनाही निलंबित केले होते. (वृत्तसंस्था)