लाचखोर नायब तहसीलदार, लिपिकाला अटक
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:19+5:302015-09-01T21:38:19+5:30
वरोरा : शेत जमिनीच्या सातबारावरील बहिणीचे नाव कमी करण्याकरिता आठ हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथील नायब तहसीलदार व त्याच्या लिपीकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वर्धा येथील पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

लाचखोर नायब तहसीलदार, लिपिकाला अटक
व ोरा : शेत जमिनीच्या सातबारावरील बहिणीचे नाव कमी करण्याकरिता आठ हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथील नायब तहसीलदार व त्याच्या लिपीकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वर्धा येथील पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.ए. एल. काहीलकर असे नायब तहसीलदार व महेश लोणकर असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. माढेळी शेत शिवारात असलेल्या एका शेतकर्याच्या शेतावरील सातबारावर बहिणीचे नाव होते. ते कमी करण्याकरिता दस्ताऐवज त्याने सादर केले. बहिणीचे नाव कमी करण्याकरिता तहसील कार्यालयात कार्यरत लिपीक महेश लोणकर याने आठ हजार रुपयाची मागणी केली. लाच स्वीकारताना वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. यामध्ये नायब तहसीलदार ए. एल. काहीलकर याने मदत केल्याने त्यालाही अटक करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)