शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

"मुख्यमंत्री पहिल्यांदाच गायब", हेमंत सोरेन यांचा शोध घेणाऱ्याला भाजप नेत्यांकडून 11 हजारांचे बक्षीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 13:10 IST

ही घोषणा अन्य कोणी नसून झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या गायब झाले आहेत, ते कुठे आहेत? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) टीमसोबत येथील लोकही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची वाट पाहत आहेत. त्यांचा शोध घेणाऱ्या व्यक्तीसाठी भरघोस बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. ही घोषणा अन्य कोणी नसून झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी झारखंडच्या जनतेला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करत टोला लगावला आहे. पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे केंद्रीय एजन्सीच्या भीतीने बेपत्ता झाल्याचे लिहिले आहे. तसेच, गेल्या चाळीस तासांपासून त्यांचा पत्ता नाही. मुख्यमंत्री आपले सार्वजनिक कर्तव्य सोडून बेपत्ता आहेत आणि तोंड लपवून पळत आहेत, असे म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे अशा प्रकारे बेपत्ता होणे, केवळ त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेलाच धोका नाही तर संपूर्ण झारखंडच्या लोकांच्या सुरक्षेला आणि सन्मानालाही धोका आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांचा शोध घेणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणाही मरांडी यांनी केली आहे. जो कोणीही विलंब न लावता झारखंडच्या आश्वासक मुख्यमंत्र्यांचा शोध घेईल, त्यांना शोधून सुखरूप परत आणेल, त्याला अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे बाबूलाल मरांडी यांनी म्हटले आहे.

बाबूलाल मरांडी यांचे मार्मिक आवाहनआपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी झारखंडच्या जनतेला एक मार्मिक आवाहन लिहिले आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गायब असल्याचे लिहिले आहे. 

हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्तदरम्यान, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत. सोमवारी ईडीने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे आणि हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती. हेमंत सोरेन हे शनिवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. चार्टर्ड विमानाने ते पहाटे दिल्लीला पोहोचले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. तपास यंत्रणा चौकशीसाठी त्यांचा शोध घेत आहे. मात्र त्यांचे ठिकाण अद्याप कळू शकलेले नाही.  

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाBJPभाजपा