राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:52 IST2025-07-06T15:51:55+5:302025-07-06T15:52:30+5:30
"सर्वच भाषांचा सन्मान व्हायला हवा आणि आपण त्यांचा आदर करायला हवा..."

राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
राज्यात (महाराष्ट्र) मराठी आणि हिंदी भाषेवरून राजकारण पेटले असतानाच, या वादावर आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "देशात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषा अभिमानाचे प्रतीक आहेत. सर्वच भाषांचा सन्मान व्हायला हवा आणि आपण त्यांचा आदर करायला हवा," असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ते हरिद्वार येथे पतंजलीच्या एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांसोबत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? -
भाषा वादावर बोलताना योग गुरू बाबा रामदेव म्हणाले, "देसात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषा अभिमानाचे प्रतिक आहेत आणि यांच्या सारखाच सन्मान व्हायला हवा. भाषा, जात, लिंग अथवा समुदायाच्या नावाने फूट पडल्याने राष्ट्रीय हिंदू एकता कमकुवत होते. यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला संघटित होऊन देशाची अखंडता मजबूत करायला हवी.
शिव भक्तांनी कांवड यात्रेदरम्यन नशा करण्यापासून दूर रहावे -
कांवड यात्रेसंदर्भात भाष्य करताना बाबा रामदेव यांनी मुस्लीम समाजाला आवाहन केले की, जर ते शिवभक्तांची सेवा करत असतील, तर त्यांना ओळख लपवण्याची काहीही आवश्यकता नाही. याच बरोबर, त्यांनी शिवभक्तांनाही यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारे हिंसाचार अथवा भांडण करू नये. संपूर्ण भक्ती-भावाने आणि संयमाने आचरण करावे, असे आवाहनही केले आहे. एवढेच नाही तर, भक्तीच्या या यात्रेत नशेपासून दूर रहायला हवे, तरच ती खरी श्रद्धा म्हटली जाईल, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.