शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: आधी मदतीची अफवा, आता खरोखरच मदत; विप्रोच्या अझिम प्रेमजींकडून कोट्यवधींचा निधी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 15:01 IST

Coronavirus विप्रो, अझिम प्रेमजींकडून ११२५ कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर

मुंबई: कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांची मदत केल्यानंतर आता विप्रोकडूनही कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशननं ११२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अझीम प्रेमजी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० हजार कोटी रुपयांची मदत दिल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं होतं. मात्र ते वृत्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं होतं.कोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशननं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. विप्रो लिमिटेडनं १०० कोटी, विप्रो इंटरप्रायझेसनं २५ कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशननं १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरवर्षी विप्रो कंपनी आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशन काही रक्कम सीएसआरच्या माध्यमातून दान करते. मात्र ही रक्कम त्यातील नसून अतिरिक्त असल्याचं विप्रोनं निवेदनातून स्पष्ट केलं आहे. 'कोरोनामुळे माणसांसाठी खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका समाजातल्या मोठ्या वर्गाला बसला आहे. विप्रो आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशनकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीमुळे वैद्यकीय सेवा देण्यास मदत होईल. कोरोनाचा सामना करण्यासाठी काही भागांमध्ये विशेष मदत पोहोचवण्याची नितांत गरज आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांना वैद्यकीय मदत मिळणं अतिशय आवश्यक आहे,' असं विप्रोनं निवेदनात नमूद केलं आहे. याआधी टाटांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी १५०० कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलं आहे. रविवारी त्यांनी ही घोषणा केली. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट मिळून १५०० कोटी रुपये देणार आहेत. यातील एक हजार कोटी टाटा सन्स देणार असून उर्वरित ५०० कोटी टाटा ट्रस्ट देणार आहे. तर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWiproविप्रोAzim Premjiअझिम प्रेमजीTataटाटाMukesh Ambaniमुकेश अंबानी