मोदी सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश; तिकिटांची गरज नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 17:34 IST2022-08-03T17:33:29+5:302022-08-03T17:34:43+5:30
Azadi Ka Amrit Mahotsav : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनावरून देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान सुरू झाले असून ते 2 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश; तिकिटांची गरज नाही
नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे यंदा 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनावरून देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान सुरू झाले असून ते 2 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
या पर्वात आता केंद्र सरकारने लोकांना या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात जोडण्यासाठी आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागाने 15 ऑगस्टपर्यंत सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी मोफत करणयासाठी घोषणा केली आहे.
एएसआयच्या मेमोरियल-2 चे संचालक डॉ. एन.के. पाठक यांच्यावतीने बुधवारी आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले की, 5 ऑगस्टपासून सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत. या स्थळांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक संचालक व संबंधितांना पाठविण्यात आले आहेत.
हर घर तिरंगा उपक्रम
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे स्वातंत्र्याच अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा प्रत्येक घरावर फडकवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सूचना देखील केल्या आहेत.