शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांवरील 'त्या' मजकुरानं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 20:12 IST

काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांवर बहिष्कार घालण्याचा इशारा

जम्मू: काश्मिरी सफरचंदांवर असलेल्या मजकुरामुळे एकच खळबळ माजली आहे. काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांची खोकी उघडताच त्यावरील मजकूर विक्रेत्यांच्या दृष्टीस पडले. यानंतर सफरचंदांवर बहिष्कार घालण्याचा इशारा फळ विक्रेत्यांनी दिला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांविरोधात जम्मूत निदर्शनंदेखील झाली आहेत.काश्मीरमधून जम्मूतील फळांच्या मंडईत आलेल्या सफरचंदांवर 'आम्हाला स्वातंत्र्य हवंय', 'आम्ही बुरहान वाणीवर प्रेम करतो', 'झाकीर मुसा परत ये', असा मजकूर आहे. या प्रकरणी सरकारनं कारवाई न केल्यास काश्मीरमधून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार घालू, अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे. सफरचंदांवर लिहिण्यात आलेल्या मजकुरामुळे विक्रेत्यांनी त्यांची खरेदी करण्यासदेखील नकार दिला आहे. काश्मीरमधून येणारी सफरचंद जम्मूतील घाऊक विक्रेत्यांनी खरेदी केली. त्यानंतर या सफरचंदांची खोकी विक्रेत्यांकडे आली. त्यावेळी त्यांना सफरचंदांवर काळ्या मार्करनं लिहिलेला मजकूर दिसला. यानंतर कठुआमधील विक्रेत्यांनी आंदोलन करत पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात घोषणा दिल्या. पोलीस आणि सरकारनं या प्रकरणात लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी यावेळी केली. सध्या या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक माजिद यांनी दिली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर