Ayodhya Verdict Live Updates, Supreme Court Decision, Ram Mandir & Babri Masid Land Disputes | Ayodhya Verdict Live Updates: बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद एनएसए अजित डोवाल यांच्या भेटीला
Ayodhya Verdict Live Updates: बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद एनएसए अजित डोवाल यांच्या भेटीला

नवी दिल्ली : अयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालामुळे सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पोलिसांचा तसेच सशस्त्र दलांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊ न सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. 

05:17 PM

बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद आणि अन्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीला.

बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद आणि अन्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीला.

04:40 PM

पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड

04:33 PM

पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड

पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड

04:28 PM

सर्वप्रथम न्यायदेवतेला अक्षरशः साष्टांग दंडवत घालत आहे

03:02 PM

दिलेल्या सूचनांचे पालन करा; केंद्राकडून सर्व चॅनेल्सना दिला सल्ला

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व चॅनेल्सना अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सांगण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करा असा आदेश दिला आहे. 

02:35 PM

सुप्रीम कोर्टाचा निकाल आस्था मजबूत करणारा - देवेंद्र फडणवीस 

भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मूल्यांना मजबूत करणारा हा निकाल आहे. हा आदेश म्हणजे जय आणि पराजयचा विषय नाही, भारतीय आस्था मजबूत करणार निर्णय आहे, सर्वांनीच या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अतिशय चांगलं वातावरण मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, निर्णयाचं आदर सर्व शांतता प्रस्थापित करतील. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्वानुसार नवीन भारताकरिता सर्व लोक एकजुटीने या निर्णयाचा सन्मान करतील हा विश्वास व्यक्त करतो - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री  
 

 

01:50 PM

ही वेळ भारतभक्तीला सशक्त करण्याची - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 अयोध्या प्रकरणात आलेल्या 'सर्वोच्च' निकालाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं आहे. या निर्णयाकडे कोणीही जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नये, असं आवाहन मोदींनी केलं आहे. 

01:46 PM

अयोध्या निकालाचं शरद पवारांनी केलं स्वागत

सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णयाचं स्वागत आहे. त्याचा सन्मान सगळ्यांनी करावा, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे ते गैर नाही. शांतता आणि संयम बाळगावा असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. 

 

01:38 PM

लवकरात लवकर राम मंदिर उभं राहावं हीच इच्छा - राज ठाकरे

राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टाला धन्यवाद द्यावे तितके कमी आहे. लवकरात लवकर राम मंदिर उभं राहावं हीच इच्छा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अतिशय आनंद झाला. जे कारसेवकांनी बलिदान दिलं त्यांना न्याय मिळणार का? हा इतकी वर्ष प्रश्न होता तो आज निकाली लागला असं राज ठाकरेंनी सांगितले.आज निर्णय आला यातून सर्वात एक गोष्ट जाणविली की आज बाळासाहेब हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता. इतके वर्ष जो संघर्ष झाला त्या संघर्षाची चीज झालं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

01:09 PM

जय-पराभवाच्या दृष्टीकोनातून या निकालाकडे पाहू नये - सरसंघचालक

हे प्रकरण अनेक दशकांपासून चालू होते आणि ते योग्य निष्कर्षावर पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. जय-पराभवाच्या दृष्टीकोनातून या निकालाकडे पाहू नये, भूतकाळात जे घडलं ते विसरुया आणि पुन्हा एकत्र येऊ, समाजात शांतता अन् सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करुयात असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

01:08 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतला मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. राज्यातील सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला. 

12:56 PM

हा महत्त्वाचा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल - अमित शहा

मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा महत्त्वाचा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि महान संस्कृती आणखी बळकट होईल. श्री रामजन्मभूमी कायदेशीर वादासाठी प्रयत्नशील; संपूर्ण देशातील संत संस्था आणि बर्‍याच वर्षांपासून प्रयत्न केलेल्या असंख्य अज्ञात लोकांबद्दल मी त्यांचे आभार मानतो - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
 

12:26 PM

या निकालामुळे रामाचा वापर राजकारणासाठी थांबेल - काँग्रेस

अयोध्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे. आम्हीदेखील राम मंदिर निर्माणाच्या बाजूने आहोत. या निकालाने मंदिर बनविण्याचं दार उघडलं गेलं मात्र या मुद्द्याचं राजकारण करणाऱ्यांचे दार बंद झालं अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. 

12:05 PM

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मुस्लिम मौलानांनी केलं स्वागत

मालेगाव (नाशिक)- राम जन्मभूमी व बाबरी मशिदीच्या जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचा मालेगाव शहरातील मुस्लिम धर्मगुरूंनी आदर करीत स्वागत केले आहे. जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - मौलाना सुफी गुलाम रसुल, मौलाना अब्दुल बारी, कुल जमात तन्जीम, मालेगाव

12:04 PM

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर पण निकालाने आम्ही संतुष्ट नाही - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे पण निकालाने आम्ही संतुष्ट नाही, वकिलांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेऊ अशी भूमिका मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने घेतली आहे. 

11:57 AM

9 नोव्हेंबरला जागतिक महत्त्व, भाजपा नेते विनोद तावडेंची प्रतिक्रिया

9 नोव्हेंबरला जागतिक महत्त्व आहे. 9/11/89 राम मंदिरातील शिलान्यास बसवला, 9/11/91 ला बर्लिनची भिंत पाडली आणि आज दिनांक 9/11/2019 अयोध्येचा निकाल लागला. ही तारीख आहे ज्याने मतभेद दूर केले आणि लोकांना ऐक्याचा संदेश दिला. 

11:50 AM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं शांततेचं आवाहन

11:48 AM

जय श्री राम! शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी दिली अयोध्या निकालावर प्रतिक्रिया

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर जय श्री राम अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

11:46 AM

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा - इक्बाल अन्सारी

अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने अखेर निर्णय दिला त्याचा आनंद आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा - इक्बाल अन्सारी, अयोध्या खटल्यातील पक्षकार  

11:44 AM

सामाजिक सलोखा राखण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फायदा - नितीश कुमार

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत करायला हवं. सामाजिक सलोखा राखण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल. यापुढे कोणताही विवाद राहता कामा नये असं आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे. 

11:40 AM

सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करुन शांतता राखा - नितीन गडकरी

11:28 AM

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एकतेचा संदेश - हिंदू महासभा

सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐतिहासिक आहे, या निर्णयामुळे एकतेचा संदेश दिला आहे असं हिंदू महासभेचे वकील वरुणकुमार सिन्हा यांनी सांगितले आहे. 

11:20 AM

सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जागा द्यावी - सुप्रीम कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जागा उपलब्ध करुन द्यावी. ती जबाबदारी केंद्र किंवा राज्य सरकारची आहे. मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट स्थापन करुन नियम बनवा, केंद्राला आदेश

11:12 AM

वादग्रस्त जागा रामलल्लाचीच, मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देणार

अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाची टिप्पणी, मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा मिळणार, कोणत्याही धर्माला प्रार्थनेपासून रोखता येत नाही. अलाहाबाद हायकोर्टाने केलेले आस्थेच्या मुद्द्यावर तीन भाग चुकीचे आहेत. वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे. 

11:03 AM

ब्रिटीश येण्यापूर्वी विवादीत जागेच्या बाह्य भागावर हिंदूंचा ताबा होता

ब्रिटिश येण्यापूर्वी राम चबूत्रा, सीता रासोई यांची हिंदूंनी उपासना केली होती असे पुरावे आहेत. रेकॉर्डमधील पुरावा असे दर्शवितो की विवादित जमिनीचा बाह्य भाग हिंदूंच्या ताब्यात होता. 

10:59 AM

उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई शहरात कलम १४४ लागू

10:51 AM

प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, त्यावर कोणताही वाद नाही

बाबरी मशीद रिकाम्या जागी बनली नव्हती, मशिदीच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर होता. पुरातत्व विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात १२ व्या शतकातील अवशेष सापडले होते. अवशेष इस्लामिक कलाकृतीचे नव्हते, अयोध्येला प्रभू राम यांचे जन्मस्थान मानतात, त्यांच्या धार्मिक भावना आहेत, मुस्लिम त्याला बाबरी मशीद म्हणतात. प्रभू राम यांचा येथे जन्म झाला असा याबाबत कोणताही वाद नाही - सुप्रीम कोर्ट

10:39 AM

शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला

फैजाबाद कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली 

10:34 AM

महाराष्ट्र पोलिसांकडून सर्वांना शांततेचं आवाहन

10:33 AM

सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकीलांसोबत पक्षकार उपस्थित

अयोध्या जमीन प्रकरणात लवकरच पाच न्यायाधीशांचे सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ निकाल देणार आहे; वरिष्ठ वकील के.परसरन, सी.एस. वैद्यनाथन, राजीव धवन, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अन्य पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे अन्य वकील कोर्टात दाखल झाले.

10:27 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक सुरु, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित  

10:20 AM

थोड्याच वेळात अयोध्या निकाल वाचनाला सुरुवात होणार

09:58 AM

अयोध्या निकाल सर्वांनी मान्य करावा, शांतता राखावी - नितीश कुमार

अयोध्या प्रकरणावर जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य करावा, कोणताही वाद निर्माण करु नये, वातावरण बिघडू नये असं आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे. 

09:51 AM

भाजपाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक, अमित शहा करणार मार्गदर्शन

09:31 AM

राजस्थानच्या जयपूर भागात २४ तासासाठी इंटरनेट सेवा खंडीत

08:55 AM

सुप्रीम कोर्टाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त, कलम १४४ लागू

08:50 AM

उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू, पोलिसांची चोख व्यवस्था

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिसांनी उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू केलं आहे. त्यामुळे ४ पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

08:46 AM

दुपारी १ वाजता सरसंघचालक मोहन भागवत माध्यमांशी बोलणार

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दुपारी १ वाजता माध्यमाशी संवाद साधणार आहे. 

08:24 AM

सामाजिक सलोखा कायम ठेवा, पंतप्रधान मोदीचं देशवासीयांना आवाहन

अयोध्यावर सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय येईल, हा कोणाचा विजय किंवा पराभव ठरणार नाही. देशवासियांना माझे आवाहन आहे की या निर्णयाने भारताची शांतता, ऐक्य आणि सद्भावना या महान परंपरेला आणखी दृढ केले पाहिजे हे आपल्या सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे. देशाच्या न्यायव्यवस्थेचा सन्मान सर्वोच्च ठेवून, समाजातील सर्व घटकांनी, सामाजिक-सांस्कृतिक संघटना, सर्व पक्षकारांनी गेल्या काही दिवसात सलोखा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेल्यांचे स्वागत आहे. कोर्टाच्या निर्णयानंतरही आपण सर्वांनी मिळून सुसंवाद राखला पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना केलं आहे. 

08:21 AM

न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, शांतता राखा - नितीन गडकरी

आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवा, सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय येईल तो मान्य करुन शांतता राखावी असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 

08:21 AM

कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कित्येक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित रामजन्मभूमी विवादाचा निकाल अपेक्षित असून, या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच आता हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Web Title: Ayodhya Verdict Live Updates, Supreme Court Decision, Ram Mandir & Babri Masid Land Disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.