श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 20:12 IST2025-10-19T20:11:45+5:302025-10-19T20:12:44+5:30
Ayodhya Deepotsav 2025: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.

श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
Ayodhya Deepotsav: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. नवव्या दीपोत्सवाच्या निमित्ताने 'राम की पैड़ी' आणि सरयू नदीच्या ५६ घाटांवर तब्बल २६ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. यासह अयोध्येने पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: CM Yogi Adityanath receives the certificates of 2 new Guinness World Records created during the #Deepotsav celebrations in Ayodhya
— ANI (@ANI) October 19, 2025
Guinness World Record created for the most people performing 'diya' rotation simultaneously, and the largest… pic.twitter.com/cWREYepuwP
मागील वर्षीचा विक्रम २६ लाख ११ हजार १०१ दिव्यांचा होता, तर यावर्षी तो मोडीत काढत २६,१७,२१५ लाख दिव्यांनी रामनगरी उजळून निघाली. या विक्रमाची नोंद करण्यासाठी गिनीज बुकची टीम स्वतः अयोध्येत उपस्थित होती.
अयोध्येतील प्रत्येक चौक, रस्ता आणि मंदिर पुष्प, प्रकाश आणि रांगोळ्यांनी सजलेले होते. वातावरणात “जय श्रीराम” चा जयघोष घुमत होता.
त्रेतायुगात प्रभू रामांनी १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत येऊन जे स्वागत अनुभवले होते, त्याच पवित्रतेचा आणि आनंदाचा अनुभव आज पुन्हा घेतल्यासारखा भासत होता.
#WATCHअयोध्या, उत्तर प्रदेश: दीपोत्सव 2025 के लिए अयोध्या में सरयू नदी के तट पर राम की पैड़ी पर बड़ी संख्या में लोग एकत्रित हुए।
— ANI_HindiNews (@AHindinews) October 19, 2025
(सोर्स: ANI/यूपी सरकार) pic.twitter.com/3P5vnUSsob
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पक विमानाच्या प्रतीकात्मक स्वरूपात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्तींचे स्वागत केले. यानंतर रामकथा पार्कच्या मंचावर श्रीरामाचा राज्याभिषेक (राजतिलक) करण्यात आला. भरत मिलापाचे दृष्य साकारले गेले आणि संपूर्ण परिसर “जय श्रीराम” च्या घोषाने दुमदुमला.
योगी आदित्यनाथांनी श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि गुरु वशिष्ठ यांना तिलक लावून आरती केली, त्यानंतर रामललाच्या दर्शनासाठी श्रीराम जन्मभूमी मंदिरात गेले.
#WATCH | Uttar Pradesh: 'Ram Siya Ram' echoes through Ram Ki Paidi on the banks of the River Saryu in Ayodhya. #Deepotsav is being celebrated here.
— ANI (@ANI) October 19, 2025
(Source: ANI/UP Govt) pic.twitter.com/Ihir6VBumR
३३ हजार स्वयंसेवकांचा सहभाग
या भव्य दीपोत्सवासाठी सुमारे ३३ हजार स्वयंसेवकांनी मागील काही महिन्यांपासून तयारी केली होती. अवध विद्यापीठ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संपूर्ण सरयू तटावर दिवे लावण्याचे काम केले. २०१७ पासून योगी सरकारने सुरू केलेला दीपोत्सव आता जागतिक पातळीवर ओळखला जाणारा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव बनला आहे. हा अद्वितीय सोहळा अनुभवण्यासाठी देश-विदेशातून हजारो भाविक अयोध्येत दाखल झाले.