अयोध्या प्रकरण : मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 18:00 IST2018-03-14T17:53:08+5:302018-03-14T18:00:43+5:30
सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सर्व हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या.

अयोध्या प्रकरण : मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द
नवी दिल्ली : आजपासून सर्वोच्च न्यायालयात अयोध्या राममंदिर प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. मुख्य याचिका वगळता सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. खटल्यात केवळ मुख्य पक्षकाराचीच बाजू ग्राह्य धरली जाणार आहे. इतर याचिकामुळे अनावश्यक हस्तक्षेप होत आहे, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाचे नोंदवले आहे. या संबंधिची पुढची सुनावणी आता 23 मार्चला होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दाखल झालेल्या 20 हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सर्व हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या. आता या खटल्यात निर्मोही आखाडा, रामलल्ला आणि सुन्नी वक्फ मंडळ हे तीन पक्षकार असतील.
रामजन्मभूमी प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी हस्तक्षेप केलेल्या याचिका बाजूला केल्या आहेत. अनेक संस्था आणि व्यक्तींनी अयोध्या प्रकरणी याचिका दाखल केल्या होत्या. सलमान खुर्शीद, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह विविध संस्थांना या खटल्यातून बाजूला केले आहे.