"हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत..."; बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:50 IST2024-12-15T16:50:00+5:302024-12-15T16:50:34+5:30
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे.

"हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत..."; बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला प्रश्न
बांगलादेशातहिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरून आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही प्रश्न उपस्थित केला आहे. याचवेळी त्यांनी I.N.D.I.A. चे नेतृत्व करण्यावरून सुरू असलेल्या संघर्षावरही प्रतिक्रिया दिली आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे. आज बांगलादेश जरी बांगलादेश असला... तर पूर्वी तो पाकिस्तान होता आणि त्याआधीही तो भारत होता. ते हिंदू आपलेच आहेत आम्हीही त्यांच्याशी जोडलेलो आहोत. यामुळेच चिंतित आहोत."
ते पुढे म्हणाले, "भारत सरकार हे थांबवेल अशी आशा आहे आणि अशी विनंतीही आम्ही करत आहोत. मात्र, वेळ निघून जात आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ही विचार करण्याची गोष्ट आहे की, हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत सरकार यावर योग्य पद्धतीने उत्तर द्यायला सक्षम नाही."
I.N.D.I.A.च्या नेतृत्वासंदर्भात काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद? -
I.N.D.I.A.चे नेतृत्व करण्यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. ते म्हणाले, "मी अथवा बाहेरील कुणीही व्यक्ती यासंदर्भात बोलू शकत नाही. कुणी प्रतिनिधित्व करावे, याचा विचार आघाडीत सहभागी असलेले पक्ष करतील."
मानवाधिकार संघटना सेंटर फॉर डेमोक्रसी, प्लुरॅलिझम अँड ह्युमन राइट्सने (CDPHR) शुक्रवारी ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीसंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात 150 हून अधिक हिंदू कुटुंबांवर हल्ले, अनेक घरांना आग लावणे, सुमारे 20 मंदिरांची तोडफोड आणि लुटालूट केल्याचा दावा करण्यात आला आहे.