काश्मीरमध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन; 10 जण अडकल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 10:36 PM2019-02-07T22:36:15+5:302019-02-07T22:36:42+5:30

काश्मीरमध्ये पोलिसांनी आणि यंत्रणांनी बचाव कार्य सुरु केले आहे. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे.

Avalanche on police post in Kashmir; 10 police likely to get stuck | काश्मीरमध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन; 10 जण अडकल्याची शक्यता

काश्मीरमध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन; 10 जण अडकल्याची शक्यता

googlenewsNext

कुलगाम : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी बर्फवृष्टी सुरु आहे. कुलगाम जिल्ह्यातील जवाहर टनेल भागामध्ये पोलिस चौकीवर हिमस्खलन झाल्याने दहा पोलिस अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 



 

काश्मीरमध्ये पोलिसांनी आणि यंत्रणांनी बचाव कार्य सुरु केले आहे. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे.


हिमाचल प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव सुरु झाला असून सर्वत्र बर्फाचे ढिगारे साचले आहेत. पुढील काही दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 


Web Title: Avalanche on police post in Kashmir; 10 police likely to get stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.