शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो

By admin | Updated: January 22, 2015 00:06 IST

प्रदूषणमुक्त ऑटोची वयोमर्यादा २० वर्षे करणार

प्रदूषणमुक्त ऑटोची वयोमर्यादा २० वर्षे करणार
ऑटोचालकांना दिलासा : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा निर्णय

नागपूर : प्रदूषणमुक्त नागपूर करण्याच्या दृष्टीने जे ऑटोचालक पुढाकार घेतील तसेच इलेक्ट्रॉनिक मीटरने चालतील त्यांच्या ऑटोची वयोमर्यादा २० वर्षे करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
ऑटोचालक संघटनेच्यावतीने चार प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या. ज्या ऑटोला १६ वर्षे पूर्ण झाली आहे, त्याच्या परवान्याचे नूतनीकरण करून ही वयोमर्यादा २० वर्षांपर्यंत वाढविण्यात यावी. तसेच तांत्रिक कारणांमुळे जे ऑटोचालक आपल्या परमिटचे नूतनीकरण करू शकलेले नाही त्यांना परमिट नूतनीकरणासाठी संधी देण्यात यावी आणि मीटरचा सुरुवातीचा दर २० रुपये व त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे १८ रुपये करण्यात यावा. शिवाय जर मूळ मालकाचा मृत्यू झाला असेल व जर ऑटो परमिटसह विकत घेतला असेल तर त्याला हस्तांतरण करण्यासाठी संमती पत्राची आवश्यकता पडणार नाही या महत्त्वाच्या मागण्या होत्या. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन येथे संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात आली होती. यावेळी ऑटोचालकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
जे ऑटोचालक सीएनजी, एलपीजी, बायोडिझेल, इथेनॉल इत्यादींचा वापर करून प्रदुषणमुक्त नागपूर करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतील शिवाय मीटरने ऑटो चालवतील, त्यांच्या वाहनाला २० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्याचा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मुदत संपलेल्या परवान्याच्या नूतनीकरणाचे अर्ज विलंब शुल्कासह स्वीकारण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती देण्यात आली. परवाना हस्तांतरणाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर परवानाधारकास नोंदणीकृत डाकेने ७ दिवसांची मुदत देऊन कार्यालयात हजर राहण्याबाबत कळविण्यात येईल. जर तो हजर झाला नाही तर आणखी ७ दिवसांची मुदत देण्यात येईल. जर दोन्ही नोटीसनंतर जर परवानाधारक उपस्थित झाला नाही तर परवाना हस्तांतरणाचा निर्णय हस्तांतरणाच्या गुणवत्तेनुसार करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला.