औरंगाबादचा स्वप्नील जागतिक तलवारबाजी स्पर्धेत खेळणार
By Admin | Updated: June 21, 2014 00:15 IST2014-06-21T00:15:37+5:302014-06-21T00:15:37+5:30
औरंगाबाद : औरंगाबादचा तलवारबाजीतील प्रतिभावान खेळाडू स्वप्नील तांगडे हा जागतिक तलवारबाजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. रशियातील कझान येथे १५ ते २३ जुलैदरम्यान जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी स्वप्नील तांगडे याची भारताच्या तलवारबाजी संघात निवड झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे यांनी दिली.

औरंगाबादचा स्वप्नील जागतिक तलवारबाजी स्पर्धेत खेळणार
औ ंगाबाद : औरंगाबादचा तलवारबाजीतील प्रतिभावान खेळाडू स्वप्नील तांगडे हा जागतिक तलवारबाजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. रशियातील कझान येथे १५ ते २३ जुलैदरम्यान जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी स्वप्नील तांगडे याची भारताच्या तलवारबाजी संघात निवड झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे यांनी दिली.हैदराबाद येथे डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादचा स्वप्नील तांगडे हा खेळाडू टॉप आठमध्ये आला होता. त्याची ही कामगिरीच त्याचा भारतीय संघातील समावेश करण्यासाठी पुरेशी ठरली होती. स्वप्नील तांगडेसह नाशिकचा अजिंक्य दुधारेही रशियात होणार्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. जागतिक अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेत स्वप्नील तांगडे हा फॉईल आणि अजिंक्य दुधारे हा इप्पी प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.स्वप्नील तागंडे याने आतापर्यंत १३ वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे दोन वेळेस आंतरविद्यापीठ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. स्वप्नीलने २00४ साली सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे २00७-0८ मध्ये अमरावती येथे १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा, २00८-0९ मध्ये हैदराबाद येथील ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा, २00९-२0१0 मध्ये हुस्सूर येथील ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी स्वप्नील हा कसून सराव करीत आहे.पदक जिंकणार...भारतीय संघातील निवडीबद्दल आपण आनंदी आहोत. रशियातील स्पर्धेसाठी आपण गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात सकाळी २ आणि सायंकाळी ३ तास असे एकूण ५ तास कसून सराव करीत आहोत. या स्पर्धेतून आशिया स्पर्धेसाठीही पात्रता मिळू शकते. त्यामुळे पदक जिंकण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावणार असल्याचे स्वप्नील तांगडे याने लोकमतशी बोलताना सांगितले.