गळतीचा शोध घेण्यासाठी पाण्याचे होणार ऑडिट
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
नवी मंुबई : शहराला होणार्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी १९ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाण्याच्या गळतीचा शोध घेवून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाण्याचे ऑडिट करण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतला आहे. तशा आशयाचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गळतीचा शोध घेण्यासाठी पाण्याचे होणार ऑडिट
नवी मंुबई : शहराला होणार्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी १९ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाण्याच्या गळतीचा शोध घेवून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाण्याचे ऑडिट करण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतला आहे. तशा आशयाचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत अनेक नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेवून चर्चा केली. अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र त्यात पारदर्शकता आणावी. लोकांना त्याचा त्रास होणार नाही, या दृष्टीने कारवाईचे स्वरूप आखावे, अशी सूचना आमदार नाईक यांनी आयुक्तांकडे केली. अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करताना संबंधितांना अगोदर नोटीस द्या. त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी सूचित केले आहे. दरम्यान, आमदार नाईक यांच्या मागणीची दखल घेत महापौर सोनवणे यांनी तशा आशयाचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. नवीन नळजोडणी घेताना नागरिकांना काही बाबी गैरसोयीच्या ठरत असतील तर त्यात सुधारणा करा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच मागेल त्याला पाणी या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात त्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती महापौर सोनवणे यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)