...अबब! एका रोहित्रावर ५० विद्युत जोडण्या टिटवा येथील प्रकार: पुरेशा दाबाअभावी कृषिपंप बनले शोभेच्या वस्तू

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:20+5:302014-12-12T23:49:20+5:30

टिटवा: बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा शेतशिवारातील वीज कंपनीच्या विद्युत रोहित्रावरून (ट्रान्सफॉर्मर) पाच, दहा नव्हे तर चक्क ५० शेतकर्‍यांना विद्युत जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रोहित्रावर अतिरिक्त भार येत असून, पुरेसा विद्युत दाब मिळत नसल्याने कृषिपंप शोभेच्या वस्तू बनले आहेत.

Aub! There are 50 electric connections in Rohitra, such as Titwa type: Agril. | ...अबब! एका रोहित्रावर ५० विद्युत जोडण्या टिटवा येथील प्रकार: पुरेशा दाबाअभावी कृषिपंप बनले शोभेच्या वस्तू

...अबब! एका रोहित्रावर ५० विद्युत जोडण्या टिटवा येथील प्रकार: पुरेशा दाबाअभावी कृषिपंप बनले शोभेच्या वस्तू

टवा: बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा शेतशिवारातील वीज कंपनीच्या विद्युत रोहित्रावरून (ट्रान्सफॉर्मर) पाच, दहा नव्हे तर चक्क ५० शेतकर्‍यांना विद्युत जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रोहित्रावर अतिरिक्त भार येत असून, पुरेसा विद्युत दाब मिळत नसल्याने कृषिपंप शोभेच्या वस्तू बनले आहेत.
बार्शीटाकळी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टिटवा शिवारात मोठ्या प्रमाणात ओलित शेती केली जाते. परिसरातील लोकांना मोटारपंपांसाठी विद्युत जोडण्या देण्यासाठी येथील सांगदे यांच्या शेतात पिंजर वीज उपकेंद्रांतर्गत १९९० मध्ये विद्युत रोहित्र बसविण्यात आले. त्यावेळी परिसरातील १० शेतकर्‍यांनी कृषिपंपांसाठी या रोहित्रावरून विद्युत पुरवठा घेतला होता. त्यानंतर मात्र विद्युत जोडण्यांसाठी अर्ज करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे एक-एक करता या रोहित्रावरून तब्बल ५० शेतकर्‍यांना विद्युत जोडण्या देण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता एका रोहित्रावरून केवळ २० कृषिपंपांसाठी विद्युत जोडण्या दिल्या जातात; परंतु येथील रोहित्रावर ३० जोडण्या अतिरिक्त आहेत. त्यामुळे रोहित्रावर अतिरिक्त भार येत असून, हे रोहित्र वारंवार जळते. तसेच अतिरिक्त भार असल्यामुळे कृषिपंपांना पुरेसा विद्युत दाब मिळत नाही. त्यामुळे अनेक कृषिपंप जळतात, तर काही कृषिपंप पाण्याचा उपसा करण्यात अपयशी ठरत आहेत. याबाबत शेतकर्‍यांनी पिंजर विद्युत उपकेंद्राकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत; परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. मध्यंतरी येथील शेतशिवारासाठी अतिरिक्त रोहित्र मंजूर झाल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंतही नवीन रोहित्र बसविण्यात आले नाही. वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन येथे अतिरिक्त रोहित्र द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. (वार्ताहर)
फोटो- रोहित्राचा घ्यावा

Web Title: Aub! There are 50 electric connections in Rohitra, such as Titwa type: Agril.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.