निमाणी बसस्थानकातून बस पळविण्याचा प्रयत्ऩ़़
By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:32+5:302015-08-22T00:43:32+5:30
जागरूक कर्मचार्यांमुळे फसला प्रयत्न : माथेफिरूस अटक

निमाणी बसस्थानकातून बस पळविण्याचा प्रयत्ऩ़़
ज गरूक कर्मचार्यांमुळे फसला प्रयत्न : माथेफिरूस अटकनाशिक : शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास पंचवटीतील निमाणी बसस्थानकातील शहर बस पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्या एका माथेफिरूस महामंडळाच्या जागरूक कर्मचार्यांनी पकडून चांगलाच चोप दिला़ माथेफिरूस पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे़पंचवटीच्या डेपो नंबर दोनमध्ये बसचालक म्हणून कार्यरत असलेले उत्तम पुंडलिक साबळे हे गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास नाशिकरोडहून निमाणीमध्ये शहर बस (एमएच १४, बीटी ४४७१) घेऊन आले़ यानंतर अडीच वाजेच्या सुमारास ही बस निमाणी ते शिवाजीनगर अशी जाणार होती़ बसचालक साबळे हे बस उभी करून नियंत्रण कक्षाकडे जात असताना शामभय्या राधेभय्या कुड्डू (३०, रा़मंडलम, बेमलपाडा, जि़करीमनगर, आंध्रप्रदेश) हा बसमध्ये चढला व बस पळवून नेण्याचा प्रयत्न केला़सदर प्रकार वाहतूक नियंत्रक के़़पीग़ायकवाड व बसवाहक यू़ एऩराजवाडे यांच्या लक्षात येताच त्यांची कुड्डू यास अडवून खाली उतरवून चोप देत पोलिसांच्या हवाली केले़ या प्रकरणी साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात कुड्डु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)