शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 5:05 PM

पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू

पॅरिस: राफेल डीलचा आढावा घेण्यासाठी फ्रान्सला गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाच्या कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सची राजधानी पॅरिसबाहेर रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती हवाई दलाकडून संरक्षण मंत्रालयाला देण्यात आली. रविवारी रात्री भारतीय हवाई दलाच्याराफेल डीलबद्दलच्या आढावा पथकाच्या कार्यालयात काही अज्ञात व्यक्तींनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती चोरण्याच्या उद्देशानं हा प्रयत्न करण्यात आला. 'राफेल प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाचं कार्यालय पॅरिसबाहेरील उपनगरात आहे. त्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न झाला. यावेळी कोणतीही कागदपत्रं किंवा हार्ड डिस्क चोरीला गेली नाही. याबद्दलची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही,' असं हवाई दलातील सूत्रांनी सांगितलं.राफेल प्रकल्पाचं पथकाचं नेतृत्त्व ग्रुप कॅप्टन रँकच्या अधिकाऱ्याकडून केलं जातं. 36 राफेल विमानांच्या निर्मितीपासून वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापर्यंतची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे आहे. वैमानिकांना उड्डाणाचं आणि ग्राऊंड स्टाफला देखभालीच्या कामाचं प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या या पथकाचं कार्यालय पॅरिसमधील सेंट क्लाऊड सबर्बमध्ये आहे. या कार्यालयात फारशी रोख रक्कम नसते. त्यामुळे गोपनीय माहिती चोरण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न झाला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दल