शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:41 IST

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज त्यांच्या सिव्हिल लाईन्स या सरकारी निवासस्थानी साप्ताहिक जनसुनावणी दरम्यान हल्ला करण्यात आला. जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि हल्ल्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या घटनेचा निषेध केला.

बुधवारी सकाळी साडेआठ वाजता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता सीएम सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी जनसुनावणी घेत होत्या. त्यादरम्यान गर्दीतून एका ३५ वर्षीय व्यक्तीने उभे राहून मुख्यमंत्र्यांना एक कागद दिला. मुख्यमंत्र्यांना काही समजण्यापूर्वीच त्या व्यक्तीने त्यांना कानाखाली मारली. त्या व्यक्तीने मुख्यमंत्र्याचे केस ओढले आणि त्यांना चापट मारली. गुप्ता जखमी झाल्या नसल्या तरी, या घटनेने त्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, डॉक्टरांचे एक पथकही गुप्ता यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. घटनेनंतर लगेचच जवळ उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांकडे  दिले. ती व्यक्ती कोण हीता आणि त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे शोधले जात आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणी दरम्यान झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करून सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

दरम्यान, २० फेब्रुवारी २०२५ रोजी रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला. रेखा गुप्ता बऱ्याच काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील राहिल्या आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिस