कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर हल्ला; गाझियाबादहून अलीगडला जात असताना अचानक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:11 IST2023-11-08T16:10:30+5:302023-11-08T16:11:33+5:30

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या ताफ्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे.

attack on security personnel in the convoy of renowned poet kumar vishwas | कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर हल्ला; गाझियाबादहून अलीगडला जात असताना अचानक...

कुमार विश्वास यांच्या ताफ्यावर हल्ला; गाझियाबादहून अलीगडला जात असताना अचानक...

गाझियाबादहून अलीगडला जाताना प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या ताफ्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा रिपोर्ट पोलिसांना देण्यात आला आहे. कुमार विश्वास यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. 

कुमार विश्वास यांनी सांगितलं की, "आज मी अलीगडला जात असताना वसुंधरा येथील माझ्या घरातून निघालो. हिंडनच्या काठावर आलो तेव्हा एका कार चालकाने त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कारला दोन्ही बाजूंनी धडक देऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला."

"जेव्हा सुरक्षा कर्मचार्‍यांनी खाली येऊन त्या व्यक्तीला चौकशीसाठी थांबवले तेव्हा त्याने केवळ यूपी पोलीस हवालदारावरच नव्हे तर केंद्रीय दलाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. यामागचं कारण कळू शकलेलं नाही. देव सर्वांना सुरक्षित ठेवो. तुमच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार."

बुधवारी संध्याकाळी अलीगडमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कविसंमेलनात डॉ.कुमार विश्वास यांच्याशिवाय कवी सुदीप भोला, कवयित्री कविता तिवारी यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कुमार विश्वास गाझियाबादच्या वसुंधरा येथून अलीगडला रवाना झाले होते. 
 

Web Title: attack on security personnel in the convoy of renowned poet kumar vishwas