छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 08:21 IST2024-01-06T08:20:34+5:302024-01-06T08:21:55+5:30

हल्ल्यात किमान दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 

Attack on raiding ED team; vandalism of vehicles; 2 seriously injured | छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी

छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड; २ गंभीर जखमी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या समर्थकांनी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यात दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. शिधावाटप (रेशन) घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील शाहजहान यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी अधिकारी आले होते.

ईडीचे अधिकारी सकाळी संदेशखळी भागातील शेख यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा मोठ्या संख्येने तृणमूलच्या समर्थकांनी त्यांना घेराव घातला. अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्यासाठी अनेक वेळा शेख यांना बोलावले. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शेख यांच्या समर्थकांनी हल्ला केला. हल्ल्यात किमान दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 
 

 

Web Title: Attack on raiding ED team; vandalism of vehicles; 2 seriously injured