शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लास वेगासमधील हल्ल्याप्रमाणे कुंभ मेळ्यावर हल्ला करू - इसिसची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 19:08 IST

इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट हिने पुन्हा एकदा भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

नवी दिल्ली - इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट हिने पुन्हा एकदा भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. कुंभ मेळा आणि त्रिसूर पूरम सारख्या पर्वांदरम्यान भारतात लास वेगास स्टाइलमध्ये हल्ला करण्यात येईल, अशी धमकी आयएसने दिली आहे. आयएसने ऑडिओ क्लीप प्रसारित करून ही धमकी दिली आहे. आयएसने प्रसारित केलेली ऑडिओ क्लीप दहा मिनिटांची आहे, मल्याळम भाषेत असलेल्या या क्लीपमध्ये कुंभ मेळा आणि त्रिसूर पूरमसारख्या महापर्वांवेळी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. कुंभ मेळा आणि त्रिसूर पूरम या पर्वावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या दोन्ही पर्वांना होणाऱ्या गर्दीचे प्रमाण पाहिल्यास अशा गर्दीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते.आयएसने प्रसारित केलेल्या दहा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्यील आवाज पुरुषाचा असून, त्याने कुराणामधील आयतांचा उल्लेख केला आहे. तसेच त्यामध्ये भारतावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या भागात कार्यरत असलेली आयएसची संघटना दौलातुल इस्लाम हिची ही 50 वी ऑडिओ क्लीप आहे. यामध्ये लास वेगास येथील हल्ल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. लास वेगास येथील हल्ल्याची जबाबदारी आयएसने घेतली होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एका टोलेजंग इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून खुल्या मैदानातील खचाखच भरलेल्या संगीत महोत्सवावर एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तब्बल ५८ हून अधिक जण ठार झाले होते. या हल्ल्याने लास वेगससारखे पर्यटकांचे हब हादरले असून, संपूर्ण अमेरिकेलाही याचा धक्का बसला होता.रात्रीच्या काळोखात हॉटेलच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून येणाºया बंदुकीच्या गोळ््यांच्या प्रकाशशलाका प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्या. त्यामुळे घटनेनंतर काही मिनिटांतच तेथे दाखल झालेल्या पोलिसांच्या विशेष ‘स्वॅट’ पथकाने सरळ मोर्चा हॉटेलकडे वळविला. ३२ व्या मजल्यावर हल्लेखोर सापडला व तेथेच त्यास ठार मारण्यात आले, असे पोलिसांनी सुरुवातीस सांगितले. मात्र नंतर त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त अमेरिकी प्रसिद्धी माध्यमांनी दिले. स्टिफन पॅडॉक असे या ६४ वर्षांच्या हल्लेखोराचे नाव होते. तो लास वेगसपासून ८० मैलावर नेवादा राज्यातील मेस्क्विट येथील रहिवासी होता.  

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादISISइसिस