Attack in JNU: Investigation of 2 suspects, JNU professor, student boycott of classes started | जेएनयूमधील हल्ला:३ संशयितांची चौकशी; प्राध्यापक, विद्यार्थी यांचा वर्गांवरील बहिष्कार सुरूच
जेएनयूमधील हल्ला:३ संशयितांची चौकशी; प्राध्यापक, विद्यार्थी यांचा वर्गांवरील बहिष्कार सुरूच

नवी दिल्ली : फीवाढीच्या विरोधात जेएनयूमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी यांनी वर्गांवर घातलेला बहिष्कार सोमवारीही कायम होता. प्रशासन आमचे प्रश्न सोडवेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ५ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी क्राईम ब्रँचच्या पथकाने विद्यापीठात जाऊन सोमवारी जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह तीन विद्यार्थ्यांची चौकशी केली.

पंकज मिश्रा, वास्केर विजय मेच व आयशी घोष या तिघांवर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली. हल्ल्याप्रकरणी नऊ संशयितांची छायाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली होती. त्यात या तिघांचा समावेश आहे. हल्ल्यात आयशी घोष जखमी झाली होती. सेमिस्टर रजिस्टर प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याच्या मुद्यावरून जेएनयूमध्ये वातावरण तंग होते. त्याची परिणती हिंसक हल्ल्यात झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हल्ला घडविणाऱ्यातील नऊपैकी सात जण डाव्या विचारसरणीचे, तर अन्य दोन अभाविपचे असल्याचा कयास आहे.

अभाविपचा दावा करणाºया अक्षत अवस्थी याने जेएनयूतील हल्ला आपणच घडविल्याचा दावा एका नियतकालिकाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये केला होता. हाणामारी करताना चेहरा झाकण्यासाठी अक्षतने आपला मित्र रोहित शहा याच्याकडून हेल्मेट घेतले होते. जेएनयूत झालेल्या हल्ल्यात चेहरा झाकलेल्या कोमल शर्मा या विद्यार्थिनीची पोलिसांनी ओळख पटविली आहे. कोमल ही दौलतराम कॉलेजची विद्यार्थिनी आहे. ती, अक्षत व रोहितने चौकशीसाठी हजर राहावे याकरिता त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भातील (सीएए) शंकानिरसन करण्यासाठी पाच कडवे टीकाकार निवडून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाहिनीवर करावा, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम पाहून जनता आपले मत बनवील, असेही त्यांनी सांगितले.

चिदंबरम यांनी यासंदर्भात केलेल्या एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझ्या मागणीला पंतप्रधान मोदी प्रतिसाद देतील अशी आशा वाटते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे, तर देण्यासाठी बनविला आहे असे मोदी म्हणतात. एनआरसी, एनपीआरशी जोडला जाणारा हा कायदा देशातील अनेक लोकांचे नागरिकत्व हिरावून घेईल अशी शंका आहे. मोदी जाहीर सभांतून, कार्यक्रमांतून या कायद्याचे समर्थन करीत आहेत.

कुलगुरूंवर कारवाईची मागणी

  • फीवाढीचा निषेध करीत जेएनयूतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आज वर्गांवर सामूहिक बहिष्कार टाकला. प्राध्यापकांनी वर्गावर शिकविण्यासाठी हजर व्हावे, असा जेएनयू विद्यापीठ प्रशासनाने दिलेला आदेश प्राध्यापकांनी धुडकावून लावला आहे.
  • जेएनयूमधील विद्यार्थी व शिक्षकांना भेडसावणाºया प्रश्नांची सोडवणूक न झाल्यामुळे वर्गांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
  • कुलगुरू एम. जगदीशकुमार यांना बडतर्फ करावे व त्यांच्यावर हल्ल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी, प्राध्यापक करीत आहेत. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण नसल्याची तक्रार जेएनयूटीएलचे अध्यक्ष डी. के. लोबियाल यांनी केली आहे.

Web Title: Attack in JNU: Investigation of 2 suspects, JNU professor, student boycott of classes started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.