पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:04 IST2025-05-01T14:03:59+5:302025-05-01T14:04:30+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे वीजा रद्द केले असून त्यांना गुरुवारपर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. यामुळे पाकिस्तानी नागरिक ...

पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतानेपाकिस्तानी नागरिकांचे वीजा रद्द केले असून त्यांना गुरुवारपर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. यामुळे पाकिस्तानी नागरिक असलेळी सीमा हैदरही अडचणीत सापडली आहे. यातच, एटीएसनेही विविध पद्धतीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, सीमा आता रुग्णालयात पोहोचली आहे. यासंदर्भात सीमाचे वकील एपी सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
खरे तर सीमाने गेल्या काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान आता भारत-पाकिस्तान तणाव वाढला आहे. सरकार पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीमा पुन्हा चर्चेत आली आहे. यापूर्वी सीमाची चौकशीही झाली आहे. सीमाची मुलगी आजारी असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले आहे. सध्या सीमाच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीमाला भारत सोडण्याचा आदेश नाही -
सीमाचे वकील एपी सिंह म्हणाले, एटीएस सखोल चौकशी केली असून अद्याप कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह गोष्ट समोर आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, सीमाला अद्याप सोडण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा आदेश मिळालेला नाही. सीमा 2023 मध्ये नेपाळ मार्गे भारतात आली होती. तिला चार मुलंही आहेत. तिने सचिन मीणा सोबत हिंदू पद्धतीने लग्नही केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव -
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. यानंतर, भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्यापासून, ते पाकिस्तानसाठी हवाई हद्द बंद करण्यापर्यंत पाकिस्तान विरोधात विविध प्रकारची पावले उचलली आहेत. यापूर्वी पाकिस्ताननेही भारतासाठी आपली हवाई सीमा बंद केली होती.