शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

डोक्यात 1, मानेत 1 अन् छातीत 1...अतिकला मारल्या 8 गोळ्या; पोस्टमार्टम रिपोर्ट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 19:30 IST

अतिक आणि अशरफ यांचे आज पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्या दोघांचा दफनविधी आजच होणार आहे.

प्रयागराज: माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची शनिवारी रात्री पोलिसांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना तीन तरुणांनी घडवून आणली. हे तिघेही पत्रकार असल्याचे भासवत पोलिसांच्या ताफ्याजवळ पोहोचले होते. यावेळी हल्लेखोरांनी 18 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 8 गोळ्या अतिक अहमदला लागल्या. अतिकच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे.

अतिक आणि अशरफचे रविवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी अतिकच्या शरीरातून एकूण 8 गोळ्या काढल्या. त्यापैकी 1 डोक्यात, 1 मानेत, 1 छातीत आणि 1 कमरेत घुसली आहे. दुसरीकडे, अशफला 5 गोळ्या लागल्या आहेत. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आजच त्यांच्यावर दफनविधी होणार असल्याची माहिती आहे.

हल्लेखोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने अतिक-अशरफ यांच्या तिन्ही हल्लेखोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. घटनेच्या वेळी पोलिसांनी तिघांनाही घटनास्थळावरून पकडले होते. तिघांचीही कोठडीत चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून हे हत्याकांड घडवण्याचे कारणही सांगितले. पोलिसांनी या तिघांची कुंडली तपासली असता, ते हिस्ट्रीशीटर असल्याचे समोर आले. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

कासारी-मासारीत दफनविधी होणारप्रयागराजमधील कासारी मसारी स्मशानभूमीत अतिक आणि अशरफ यांच्यासाठी कबर खोदण्यात आली आहे. या दोघांवर आजच दफनविधी होणार आहे. यापूर्वी शनिवारी अतिक अहमदचा मुलगा असद यालाही याच स्मशानभूमीत दफन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळीच असदचा मृतदेह झाशीहून प्रयागराजला आणण्यात आला होता. झाशीच्या बारागाव पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी यूपी एसटीएफने त्याला चकमकीत ठार केले होते.

मारेकऱ्यांची ओळख पटलीअतिक आणि अशरफ यांची हत्या करणारा लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे, तर अरुण मौर्य हा कासगंजचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, तिसरा आरोपी सनी हा हमीरपूर जिल्ह्यातील आहे. चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी आपला एकच पत्ता दिला आहे. पोलिस त्यांच्या जबाबाची पडताळणी करत आहेत. तपासात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, तिन्ही आरोपी अतिक आणि अशरफ यांची हत्या करण्याच्या उद्देशानेच प्रयागराज येथे आले होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस